शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७.५२ कोटींचा दंड भरा नाही तर लोकअदालतीला हजर व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2023 19:05 IST

Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर रहावे लागणार आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान

दयानंद पाईकराव

नागपूर : वाहन चालविताना अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. सिग्नलवर वाहतूक पोलिस दिसला नाही की अनेकजण सिग्नल तोडून निघून जातात. अशा वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांनी मोबाइलमध्ये घेतलेल्या छायाचित्राच्या माध्यमातून ई- चलान पाठविण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले आहे. ई-चलान पाठविल्यानंतर ते न भरल्यास संबंधित वाहनचालकाला समन्स पाठविण्यात येत असून, त्यांना लोकअदालतीला हजर रहावे लागणार आहे.

 

एकूण दंड ९.७३ कोटी, थकबाकी ७.५२ कोटी

-जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ९ लाख ७३ हजार ९३९ वाहनचालकांना ई-चलान पाठविले आहे. यातील केवळ २ लाख २१ हजार १७८ वाहनचालकांनी हे ई-चलान भरले असून अद्यापही ७ लाख ५२ हजार ७६१ वाहनचालकांनी ई-चलान भरले नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

 

कुठे भराल दंड?

-वाहतूक पोलिसांनी ई-चलान पाठविल्यानंतर संबंधित वाहनचालक डिव्हाइस उपलब्ध असलेल्या वाहतूक पोलिसाकडे दंड भरू शकतात. दंड न भरलेल्या वाहनचालकांना न्यायालयात पाठविण्यात येते. असे वाहनचालक न्यायालयात दंड भरू शकतात. याशिवाय वाहतूक परिमंडळातही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

दंड न भरल्यास काय होणार?

-दंड न भरल्यास वाहनचालकांच्या नावे न्यायालयातून समन्स काढण्यात येतो. समन्स काढून दंड न भरलेल्या वाहनचालकांना लोकअदालतीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात येते. त्यामुळे संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी दंडाची रक्कम त्वरित भरणे गरजेचे आहे.

 

मुदतीत दंड भरून संभाव्य कारवाई टाळावी

‘वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात आल्यानंतर तो दंड मुदतीच्या आत भरणे आवश्यक आहे. दंड न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी मुदतीच्या आत दंड भरणे आवश्यक आहे.’

-अमित डोळस, वाहतूक पोलिस निरीक्षक, सीताबर्डी

.............

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस