शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विजय वडेट्टीवार भाजपात आले तर त्यांचे स्वागतच  : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 20:45 IST

राज्याचे मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांना खातेवाटपादरम्यान दुय्यम खाती देण्यात आली असून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. ते जर भाजपात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करु या शब्दात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदुय्यम खाती देऊन त्यांच्यावर अन्यायच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचे मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांना खातेवाटपादरम्यान दुय्यम खाती देण्यात आली असून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. ते जर भाजपात आले तर त्यांचे निश्चितच स्वागत करु या शब्दात राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या दुय्यम खात्यामुळे ते प्रचंड नाराज असून आठवड्याभरात ते धक्कादायक निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसमध्ये बोलले जात आहे. याच अनुषंगाने बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना भाजपात येण्याचे निमंत्रणच दिले आहे.वडेट्टीवार यांच्याकडे महत्त्वाची खाती येतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. यामुळे वडेट्टीवारदेखील नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मतदान केल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांची भावना मांडली. विजय वडेट्टीवार हे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते व त्यांना मोठे खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मागील वेळी विदर्भात मुख्यमंत्रिपदासह वित्त, ऊर्जा, कृषी यासारखी महत्त्वाची खाती होती. महाविकासआघाडीने वडेट्टीवार यांना मंत्रिपद दिले. परंतु त्यांच्याकडे विदर्भाच्या विकासाला चालना देणारी खाती नाहीत. यंदा विदर्भाला महत्त्वाची खाती मिळाली नाही. वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाल्याने विदर्भावर मोठा अन्याय झाला आहे. शिवाय त्यांना अशी खाती देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर खरोखरच अन्याय झाला आहे. कॉंग्रेस सोडायची की नाही याबाबत त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे. परंतु ते जर भाजपात येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारण