बांधकामाच्या किमतीत फ्लॅट : आधुनिक टाऊनशिप गुणवत्तेत सर्वोत्तमनागपूर : श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चरच्या श्री स्वामीपुरम टाऊनशिपमध्ये ‘जी आणि एच’ विंगमधील इमारतीतील घरांच्या बुकिंगसाठी नवरात्रोत्सवात विशेष योजना दाखल केली आहे. ग्राहकांना केवळ पाच दिवसात बांधकामाच्या किमतीत फ्लॅट खरेदीची संधी आहे. विशेष योजनेंतर्गत ‘जी आणि एच’ विंगमध्ये ८६० चौ.फूटचा दोन बीएचकेचा फ्लॅट डाऊन पेमेंटवर फारच कमी किमतीत उपलब्ध आहे. नियमित बुकिंगमध्ये याच फ्लॅटची किंमत दुपटीवर जाईल. विशेष योजनेच्या घोषणेनंतर नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपली विश्वसनीयता कायम ठेवीत श्री अप्पास्वामी इन्फ्रास्ट्रक्चरने ‘ए आणि बी’ विंगमधील घरांचा ताबा आधीच दिला आहे. यासह ‘सी आणि डी’ विंगमधील घरांचा ताबा चार महिन्यात देण्यात येणार आहे.याशिवाय ‘ई आणि एफ’ विंगमध्ये तीन आणि चार बीएचकेचे रो-हाऊस दाखल केले आहे. त्याचे बांधकाम वेगात आहे. ‘जी आणि एच’ विंगमध्ये ५० टक्के फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. सर्व विंग व रो-हाऊसेसचे बांधकाम आधुनिक शैलीनुसार केले आहे. वर्धा रोड, चिचभुवन येथे साकार होणाऱ्या प्रकल्पाजवळ अनेक टाऊनशिप उभ्या होत आहेत. हा परिसर भविष्यात एक प्राईम हब बनणार आहे. हा परिसर मनपाच्या टप्प्यात येत असून वर्धा रोडवरील टाऊनशिपमध्ये घर खरेदीसाठी लोक उत्सुक आहेत. लोकांच्या मागणीनुसार कंपनीने दोन विंग दाखल केले आहे. लोकेशननुसार किंमत अत्यंत किफायत आहे. डाऊन पेमेंट रोखीने करणाऱ्यांना मोठी सूट देण्यात येत आहे. विमानतळापासून दोन कि़मी. अंतरावरील श्री स्वामीपुरममध्ये ए आणि बी विंगचे दोन टॉवर आधीच तयार असून लोकांना ताबा दिला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये चार लिफ्ट आहेत. सात माळ्याच्या या इमारतीचे बांधकाम आणि गुणवत्ता पाहून श्री स्वामीपुरमच्या गुणवत्तेचा अंदाज येऊ शकतो. कार्यालय श्री स्वामी संकुल, धरमपेठ येथे आहे. ग्राहकांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
श्री स्वामीपुरममध्ये नवरात्री आॅफर
By admin | Updated: September 30, 2014 00:39 IST