शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान चालिसा पठणासाठी माझ्या घरी यावे, बावनकुळेंचे शिवसैनिकांना आमत्रंण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 10:48 IST

हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

नागपूर : 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र बराच गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. अखेर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवून खार पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणाच्या विरोधात राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. हनुमान चालिसा पठणासाठी शिवसेनेने माझ्या घरी यावे, मी त्यांना विरोध न करता त्यांचे स्वागतच करीन असे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि राणा दाम्पत्याच्या विरोधातील कारवाईचा निषेध व्यक्त करताना आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. शिवसेनेला राणा दाम्पत्याचा इतका विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी त्यांच्यासाठी तंबू बांधला असता, चहापाण्याची अन् प्रसादाची व्यवस्था केली असती तरी पुरे झाले असते असे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 

माझ्या घरी जर कुणी हनुमान चालिसा पठणासाठी आले तर त्यांना मी टाळ मृदंग देईल, लाडवाचा प्रसाद आणि जेवणाची सोय करील असे आ. बावनकुळे म्हणाले.  हनुमान चालिसा पठणात राजकीय पक्ष महत्वाचा नाही. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष. दोन्ही कार्यकर्त्यांचे माझ्याघरी स्वागतच होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरी हनुमान चालिसा पठणासाठी जरूर यावे, माझ्या घरात त्यांचे आदरतिथ्य होईल असेही आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

किरीट सोमय्या यांच्या हल्ल्यामागे मुंबई पोलीस  

किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना त्यांच्यावर दगडफेक होते हे बरे नाही. त्यांच्यावरील हल्लेखोरांना पोलिसांचा अलिखित पाठींबा मिळतो आहे. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षा अधिक जुलमी सरकार असून प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना