शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग व्यवस्था ठप्प झाल्यास राज्यात हाहाकार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:29 IST

राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख : अनेक योजना बंद करण्यावर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या नियंत्रणाखाली राज्यातील रेशनिंग व्यवस्था राबविण्यात येते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मी स्वत: या खात्याचा मंत्री होतो. राज्यातील गरजू व गरीब रेशनकार्ड धारक लोकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याची व्यवस्था स्वस्त धान्य दुकानांमार्फत पुरवठा विभागामार्फत राबविली जाते. आघाडी सरकारच्या काळात कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत स्वस्त अन्नधान्याचे वाटप करण्यात येत होते. मात्र भाजपा युतीची सत्ता येताच पुरवठा विभागाच्या अनेक योजना तात्काळ बंद करण्यात आल्यात. त्यात आमच्या आघाडी सरकारच्या काळातील कार्ड धारकांना दिले जाणारे धान्य बंद करण्यात आले. रेशनवर मिळणारी साखरही बंद करण्यात आली अंत्योदयचा धान्य कोटा कमी केला. तसेच टप्प्याटप्प्याने गोरगरिबांना देण्यात येणारे केरोसीन सुध्दा बंद करीत आहे. अशाप्रकारे गोरगरिबांच्या तोंडचा घासच या सरकारने हिसकावला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील गोरगरीब रेशनकार्डधारकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारने संघटनासोबत बरोबर चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्या मान्य करून त्वरित तोडगा काढणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखfoodअन्न