शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णात स्वत:चे प्रतिबिंब दिसले तर खऱ्या अर्थाने होईल समाजसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 10:58 IST

दयेमुळे मदत न करता त्या व्यक्तीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब बघितले तरच खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा करता येईल, असे मत डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर भावे यांनी उलगडला वाटवानींचा जीवन प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही जीवनात जे करता, त्यामागचे कारण माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला कुणाची दया आली तर मदत करता. पण दयेमुळे मदत न करता त्या व्यक्तीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब बघितले तरच खऱ्या अर्थाने सामाजिक सेवा करता येईल, असे मत डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केले.‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या वार्षिक परिषदेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी डॉ. वाटवानींचा जीवनप्रवास उलगडला. यावेळी ते बोलत होते.डॉ. वाटवानी म्हणाले की, निराधार मनोरुग्णांसोबत कार्य करणे कठीण आहे. यामुळे अनेकदा काम सोडून द्यावे, असेही वाटले. परंतु प्रतिकूल व कठीण परिस्थितीतून बाहेर येणारी माणसे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरणेमुळे काम करता आले. आर्थिक, सोशल वर्करला भाषा येत नाही. त्याचा वैद्यकीय इतिहास माहीत नाही. त्यामुळे रस्त्यावरील निराधार मनोरुग्णांवर उपचार करणे कठीण जाते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.सामाजिक कार्यात भावनेचे महत्त्व सांगताना डॉ. वाटवानी म्हणाले की, जेव्हा काम करणे सुरू केले तेव्हा माझ्यावर पाच लाख १५ हजारांचे कर्ज होते. पण त्या रुग्णासोबत भावना जुळली आणि कर्जाचा विचार न करता रुग्णांची सेवा केली, असेही ते म्हणाले. डॉ. वाटवानी यांनी आतापर्यंत हजाराहून अधिक निराधार मनोरुग्णांची सुश्रुषा केली आहे. त्यांना आजारातून बरे करीत घरी पोहोचविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना सामाजिक कायार्साठी २०१८चा ‘रमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

-आणि बाबा आमटे भावूक झालेहेमलकसाला जाताना डॉ. वाटवानींना ‘स्किझोफ्रेनिक’ रुग्ण दिसला. त्याचे हात व पाय बेड्यांनी बांधले होते. रुग्णाला बाबा आमटेंच्या प्रकल्पात घेऊन गेले. डॉ. प्रकाश आमटेंनी त्याच्यावर सुश्रुषा केली. रात्री ४ च्या सुमारास डॉ. वाटवानींना बाबा आमटे रडताना दिसले. डॉ. वाटवानींनी विचारले असता ते म्हणाले होते की, समाज एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे कसे बांधून ठेवू शकतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे वाटवानींना सुचविले. सायकेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अश्विन भट्टड व सचिव प्रवीण नवखरे यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य