शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास डॉक्टरांनी रुग्णाला कोविड हॉस्पिटलला पाठवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:47 IST

खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी रवींद्र्र ठाकरे : खासगी डॉक्टरांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. साधारणत: ७० टक्के जवळपास मृत्यू हे वेळेत निदान न झाल्याने, भीतीपोटी, ताप, खोकला किंवा लक्षणे लपवून ठेवल्याने झाल्याचे आढळले आहे. खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.नागपूर ग्रामीण येथील तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत ते बोलत होते. तेथील कोविड कंट्रोल रूमला त्यांनी भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यावेळी उपस्थित होते. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करतेवेळी रुग्णाची मेडिकल हिस्ट्री घ्यावी. रुग्णाची अ‍ॅन्टिजेन टेस्ट करावी. अ‍ॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरपीसीआर टेस्ट करावी. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्यांच्या तपासणीला प्राथमिकता द्यावी. अ‍ॅन्टिजेन टेस्ट करतेवेळी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमदेखील सोबत ठेवावी.यानंतर बुटीबोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबतदेखील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत चर्चा केली. पुढील दोन ते अडीच महिने अत्यंत महत्त्वाचे असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर संवाद यात्रेचे आयोजन करण्याची सूचनाही केली. नगराध्यक्ष बबलू गौतम, उपाध्यक्ष अविनाश गुर्जर, तहसीलदार मोहन टिकले यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या