शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आग लागली तर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 10:31 IST

आशियातील सर्वात मोठ्या पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

ठळक मुद्देअग्निशमन कार्यालयात आवश्यक सुविधांचा अभाव उद्योगांकडून वार्षिक ८५ लाखांचा अग्निशमन सेस

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशियातील सर्वात मोठ्या पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) देण्यात येणाऱ्या सोईसुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सोमवारी तीन वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याला आग लागली आणि लगतच्या कारखान्यांमध्ये पसरली. एमआयडीसीचा आगीचा बंब उशिरा पोहोचला. त्यामुळे श्यामबाबा रिरोलिंग हा बंद कारखाना जळाला आणि लगतच्या तीन कारखान्यांना आगीची झळ पोहोचली. जर आगीचे स्वरुप उग्र असल्यास कारखान्यांचे काय होणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

एकाच अग्निशमन बंबाने सुरक्षाएमआयडीसीच्या अग्निशमन कार्यालयातील सुविधांची माहिती घेतली असता स्थिती विदारक आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र मोठे असून सध्या जवळपास ४५० पेक्षा जास्त लहानमोठे कारखाने सुरू आहेत. त्यापैकी अनेक कारखाने २४ तास सुरू असतात. एमआयडीसीचे अग्निशमन कार्यालय बुटीबोरी क्षेत्रात आहे. त्यांच्याकडे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १२ हजार लिटर क्षमतेचा एक बंब आहे. दुसरा ५ हजार लिटर क्षमतेचा बंब नादुरुस्त तर तिसरा स्क्रॅपमध्ये काढला आहे. आगीचे स्वरुप मोठे असल्यास एका बंबाने खरंच आग विझेल काय, हा गंभीर प्रश्न आहे. आग विझविताना बंब पाच मिनिटात रिक्त होतो. त्यात पुन्हा पाणी भरताना तास लागतो. अशा वेळी आग विझणार नाही आणि लगतचे कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील. उन्हाळ्यात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज दोन ते तीन कॉल कार्यालयाला येतात. एका बंबाच्या भरवशावर कारखान्यांची सुरक्षा होत आहे.

अखेर कारखान्यांचे बंब मदतीलाबुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी सांगितले की, वर्ष २००४ मध्ये परिसरातील एका मोठ्या कारखान्याला कामगारांनी आग लावली होती. त्यावेळी जवळपास २० बंब बाहेरून बोलावले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास दिवस लागला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये, अशी अपेक्षा आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याठी तीन बंब कार्यालयात असणे आवश्यक आहे. वेळोप्रसंगी इंडोरामा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे खासगी बंब मागवावे लागतात. महत्त्वपूर्ण सुरक्षा बाबीकडे एमआयडीसीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

कार्यालयात अपुरे कर्मचारीअग्निशमन कार्यालयात एमआयडीसीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास कंजुषी केली आहे. मंजूर २८ ते ३० जणांच्या कर्मचाऱ्यांऐवजी १४ जणांची भरती केली आहे. त्यात एक फायर अधिकारी, दोन ड्रायव्हर आणि अन्य कर्मचारी आहेत. उन्हाळ्यात लग्नसराई किंवा महत्त्वाच्या कामामुळे एक ड्रायव्हर हमखास सुटीवर असतो. दोघांचा भार एकावर येऊन त्याला २४ तास ड्युटी करावी लागते. राऊत म्हणाले, सोमवारी श्यामबाबा रिरोलिंग कारखान्याला दुपारी २.४५ मिनिटांनी आग लागली. एमआयडीसीचा बंब ३.३० पर्यंतही पोहोचला नव्हता. अखेर इंडोरामाचे एचआर प्रमुख निशिकांत भुरे यांना फोन करून बंब मागविला. १० मिनिटात बंब घटनास्थळी पोहोचला आणि १५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कार्यालयाला तीन गाडीची गरज आहे. नवीन गाडीला एक वर्ष झाले आहे. अनेक कारखान्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असल्यामुळे किमान तीन बंब आणि ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज आहे. बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशची आवश्यक सुविधा पुरविण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे. सुविधा नसल्यामुळे येथील कारखान्यांना कधीच आग लागू नये, असा टोला त्यांनी लगावला.

उपकरणे व मॅनपॉवरचा अभावएमआयडीसी दरवर्षी जवळपास ४५० कारखान्यांकडून ८५ लाख रुपयांचा अग्निशमन सेस गोळा करतो. त्यापैकी ५० ते ५५ लाख रुपये कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात. उरलेल्या ३० लाख रुपयांत आवश्यक सुविधा पुरविण्यात एमआयडीसी अपयशी ठरली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन बंबांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमच्याकडून गोळा केलेला पैसा आमच्यावर खर्च करीत नाहीत, हे एमआयडीसीचे अपयश आहे. आवश्यक सुविधा पुरवाव्यात.नितीन लोणकर, अध्यक्ष,बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.दिवसाला येतात किमान दोन कॉलआग लागल्याचे दिवसाला किमान दोन कॉल कार्यालयात येतात. उपलब्ध सुविधेत आगीवर नियंत्रण मिळवितो. वेळप्रसंगी लगतच्या गावांनाही सेवा देतो. १२ हजार लिटरचा एक बंब कार्यरत आहे, तर दुसरा ५,५०० लिटरचा बंब नादुरुस्त आहे. पाण्याचे प्रेशर पाहून छोटी गाडी भरायला १५ मिनिटे तर मोठ्या गाडीला एक तास लागतो. एक वर्षापूर्वी या कार्यालयात बदली झाली आहे. तत्पर सेवा देत आहेपुरुषोत्तम जाधव, फायर अधिकारी,एमआयडीसी अग्निशमन विभाग.

 

टॅग्स :fireआग