शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 16:47 IST

Nagpur News भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला.

ठळक मुद्दे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या सत्कार प्रसंगी गडकरींनी दिले शुभसंकेत

कमलेश वानखेडे

नागपूर : भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोरदिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहातचंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ‘आपणमुख्यमंत्र्यांबाबत शुभेच्छा दिल्या नाहीत, नाहीतर पुन्हा मिडियावालेगडकरी-फडणवीस आमने-सामने लावतील, अशी कोपरखळी मारत गडकरींनी बाजुसावरण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा दुसऱ्याच क्षणाला समजा पुढे फडणवीसमोठे झाले, केंद्रात गेले तर बावनकुळे यांचा नक्कीच विचार होऊ शकतो, असेसांगून गडकरींनी अप्रत्यक्षपणे बावनकुळे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्याशर्यतीत असल्याचे संकेत दिले.

भाजपा प्रदेशाध्यपदी नियुक्ती झाल्यानिमित्त आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचासत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या हस्ते शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला.यावेळी खा. रामदास तडस, माजी खा. अजय संचेती, शहर अध्यक्ष आ. प्रवीणदटके, आ. कृष्णा खोपडे, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह विदर्भातूनआलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, बावनकुळे यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने पक्षात मेहनत करून ही पदे प्राप्त केली.प्रत्येक पक्षात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात. झोकून देऊन काम करणारे वबोटावर मलम लावणारे कार्यकर्ते असतात. पण बावनकुळे हे झोकून देऊन कामकरणारे कार्यकर्ते आहेत. ऊर्जा खात्याचे मंत्री असताना त्यांनी चांगलेकाम केले. शेतकर्यांच्या कृषी पंपाचा बॅकलॉग त्यांनी कमी केला.नागपूरच्या अडचणीत असलेल्या योजना मंजूर करवून आणल्या. तिकीट मिळाले नाहीतरी पूर्ण ताकदीने पक्षासाठी त्यांनी काम केले. या परीक्षेत ते यशस्वीझाले, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

मुलाला, पत्नीला तिकीट, हे धंदे बंद

- भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे आमदाराच्या पोटातून आमदार,मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री निर्माण होत नाही. लहानकार्यकर्त्याला मोठ्या पदावर जाण्याची संधी या पक्षातच मिळते.

येथे घराणेशाही नाही. त्यामुळे आता मला नाहीतर माझ्या मुलाला, पत्नीलातिकीट द्या, हे धंदे बंद. पण जनता म्हणेल तर नक्की नक्की तिकीट मिळेल,असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे