शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरवादी गाफिल राहिले तर मोठे संकट

By admin | Updated: March 19, 2017 03:06 IST

प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे,

 भाऊ लोखंडे : ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ विषयावर चर्चासत्र नागपूर : प्रतिगामी व्यक्तींनी देश काबीज केला असतानाही आंबेडकरवादी गाफिल राहिल्यास दलित-शोषित समाजावर मोठे संकट ओढवणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांनी केले. समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन व मार्गदाता प्रकाशक समूह यांच्यावतीने ‘आंबेडकरी समाजाचे राजकीय अस्तित्व’ या विषयावर लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल वासनिक, अ‍ॅड. हंसराज भांगे वक्ते होते. मार्गदाता पत्रिकेचे संपादक दिलेश मेश्राम अध्यक्षस्थानी होते. डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम, समता सैनिक दलाचे जी. वासुदेवन व्यासपीठावर होते. डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, आंबेडकरी समाज राजकारणात शून्य झाला आहे. केंद्रापासून राज्य आणि अगदी स्थानिक पातळीवरही तो शक्तिहीन झाला असून राजकीय नेत्यांच्या चुकांचा हा परिणाम आहे. त्यामुळे समाज दिशाहीन होत गेला आहे. देशाची सत्ता प्रतिगामी शक्तींनी काबीज केल्यानंतर आरक्षण व्यवस्था संपविण्यात व पुढे संविधान बदलण्याचे षड्यंत्र ते रचत आहेत. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी समाजाने एकजूट करून संघर्ष उभारण्याची गरज आहे. समाज वेळीच सावध न झाल्यास भविष्य कठीण आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अनिल वासनिक यांनी आंबेडकरी समाजाच्या राजकीय स्थितीवर अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वरज्य संस्थांच्या निवडणुकीतील दारुण पराभवाची मीमांसा त्यांनी यावेळी केली. अपेक्षित राजकीय यश न मिळण्यास एकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. यावेळी राहुल दहिकर, के.जी. पाटील, मिलिंद फुलझेले, मधुकर बोरीकर, दिनेश खोब्रागडे, चंदू लाऊत्रे, बी.टी. वाहाणे, दिगंबर चनकापुरे, अरुण गायकवाड, धम्मपाल वंजारी, रत्नाकर मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी) संघटित व्हा अ‍ॅड. हंसराज भांगे यांनी आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगून रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि अस्ताची सविस्तर माहिती दिली. आंबेडकरी समाज राजकीयदृष्ट्या संघटित झाल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दिलेश मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांनी गटबाजी सोडून नागरिकांना राजकारणाचे व संघटनांचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले.