शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

९० कोटी मिळाले तर नागपूर मनपाला आर्थिक बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:42 IST

राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने दर महिन्याला ९० कोटींच्या जीएसटी अनुदानाची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव अनुदानाला मंजुरी मिळाली तर महापालिकेला मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.

ठळक मुद्देशासन निर्णयाची प्रतीक्षा : १७५ कोटींची याच महिन्यात अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने दर महिन्याला ९० कोटींच्या जीएसटी अनुदानाची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव अनुदानाला मंजुरी मिळाली तर महापालिकेला मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.महापालिकेला महिन्याला ५२ कोटी जीएसटी अनुदान स्वरूपात मिळतात. ही रक्कम ९० कोटीवर गेल्यास दर महिन्याला ४० कोटींची वाढ होणार आहे. यातून अत्यावश्यक खर्चाची चिंता दूर होईल. दरम्यान, स्थायी समितीने ३२५ कोटींच्या विशेष अनुदानाची मागणी केली होती. यातील पहिला हप्ता म्हणून राज्य सरकारने १५० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. उर्वरित १७५ कोटी याच महिन्यात प्राप्त होण्याची आशा आहे. वाढीव अनुदान व दुसऱ्या टप्प्यातील विशेष अनुदान प्राप्त झाल्यास विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.मागणीनुसार वाढीव अनुदान मिळाल्यास महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याला वेळ लागणार नाही. जकात सुरू असताना महापालिकेच्या तिजोरीत दररोज पैसा जमा होत होता. दैनंदिन खर्चाची चिंता नव्हती. जकात रद्द झाल्यानंतर एलबीटी लागू करण्यात आला. याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला, सत्तापक्षाचेही व्यापाऱ्यांना पाठबळ मिळाले. परिणामी एलबीटीपासून अपेक्षित उत्पन्न जमा झाले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली. जीएसटी लागू करताना एलबीटीच्या महसुलाचा आधार गृहित धरण्यात आला. महापालिकाकडून राज्य सरकारने प्रस्ताव मागविले होते. जकात बंद होण्यापूर्वी तसेच एलबीटीच्या पाच वर्षांची तुलना करून प्रत्येक वर्षी १७ टक्के वाढ करणारे अनुदान द्यावे, अशी मागणी नागपूर महपालिकेने केली होती. मात्र, हा फॉर्म्युला नामंजूर करण्यात आला होता. परिणामी अपेक्षित जीएसटी अनुदान मिळाले नाही.सर्वेक्षणानंतरही उत्पन्नात वाढ नाहीअपेक्षित अनुदान न मिळाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली. त्यातच मालमत्ता कर, नगर रचना, स्थावर, बाजार या इतर स्रोतातूनही अपेक्षित महसूल जमा झाला नाही. मालमत्ता कराची सुधारित आकारणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. मात्र नियोजनाचा अभाव व त्रुटीमुळे अजूनही डिमांड वाटपाचा घोळ संपलेला नाही. याचा मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी