शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्तीसाठी विचार प्रगल्भ हवेत : विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:57 IST

माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे रामबेगी येथे घेण्यात आलेल्या आर्ट कॅम्पमध्ये कलावंतांनी जी चित्रे साकारली या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष व विख्यात चित्रकार वासुदेव कामथ, ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. विजय दर्डा पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगात चित्रकलेचे तंत्र बदलत आहे. हे तंत्र या क्षेत्रातील नवोदितांनीही शिकले पाहिजे. कलावंतामध्ये जिद्द असली पाहिजे. एम. एफ. हुसेन यांनी चक्क रस्त्यावर बसून काम केले. पुढे ते आपल्या प्रतिभेच्या बळावर महान चित्रकार झाले. असे दर्जेदार चित्रकार घडविण्यासाठी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता येथील विद्यार्थ्यांचे चित्र विदेशात गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, निसर्ग चित्रणात चित्रकलेचे मूळ आहे, कारण यात जे समोर दिसते ते रेखाटले जाते. प्रत्येक कलावंताचे चित्र वेगळे असते, कारण ते काढण्यामागे प्रत्येकाची मनोभूमिका वेगळी असते. या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दिलीप भालेराव, श्याम डोंगरवार, नितीन पाटील, अजय रायबोले, सुनील पुराणिक, भारत सलाम, किरण पराते, दयानंद रामटेके, संजय मालधुरे, प्रफुल डेकाटे व समीर देशमुख यांचा समावेश होता. यावेळी निसर्ग चित्रण स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यांनी जिंकले पुरस्कारप्रथम- सुमित ब्राम्हणकरद्वितीय - शिवराज टिटमेतृतीय - नंदकिशोर सालवटकरचतुर्थ - करण कवाडेपाचवे - स्वप्निल रामागडेउत्तेजनार्थ - रोहित मानेकउत्तेजनार्थ - श्रीपाद भोंगाडेउत्तेजनार्थ - स्वप्निल शिरूकर

चित्र कुठे थांबवायचे हे कळले पाहिजे

निसर्ग चित्रण करताना अनेकदा कलावंत वाहवत जातात. नदी, पहाड, सूर्य, पक्षी असे सारेच समोर दिसत असल्याने चित्रचा आकार वाढतो. परिणामी दर्जा खालावतो. त्यामुळे एखादवेळी चित्रत काही उणो झाले तरी चालेल अतिरिक्त मात्र काहीच होऊ नये. चित्र काढताना आपण कुठे थांबायला हवे याचे ज्ञान चित्रकाराला असले पाहिजे, असे विचार विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले. कलावंत व समाज यांच्यातील अदृश्य दरी भरून काढण्याचे काम निसर्ग चित्रण करते. कारण, हे चित्रण करताना चित्रकार प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळत असतो. निसर्ग चित्रण हा विषय केवळ हायस्कूलच्या सबमिशनपुरता मर्यादित नाही. या चित्रंमध्ये प्राण ओतायचे असतील तर रानावनात भटकावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीpaintingचित्रकला