शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

खोट्या दस्तऐवजावर आदर्श शिक्षक पुरस्कार

By admin | Updated: February 12, 2015 02:21 IST

बेझनबाग येथील गुरू नानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक अशोक भड यांनी खोटे दस्तऐवज सादर करून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला ...

नागपूर : बेझनबाग येथील गुरू नानक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक अशोक भड यांनी खोटे दस्तऐवज सादर करून आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त केला आणि शासनाची फसवणूक केली, असा आरोप करणाऱ्या एका दाखल फौजदारी खटल्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आनंद बोरकर यांच्या न्यायालयाने सोनेगाव पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश देऊन एक महिन्यात अहवाल मागितला आहे. चौकशीदरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याकडून आरोपाशी संबंधित माहिती गोळा करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले. शंकरराव धवड पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक व टेलिकॉम्युनिकेशन विभागाचे निष्कासित झालेले प्रमुख हेमंत दारव्हेकर यांनी हा खटला दाखल केला. खटल्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार भड यांना २००३ मध्ये आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाला. वास्तविक हा पुरस्कार प्राथमिक आणि माध्यमिक प्रवर्गातील शिक्षकांनाच देण्यात येतो. भड हे उच्च माध्यमिक प्रवर्गात सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. ते अकरावी आणि बारावीला जीवशास्त्र शिकवतात. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दोन वेतनवाढ मिळत असते. त्यानुसार त्यांना वार्षिक ६० हजार रुपये मिळाले. आतापर्यंत त्यांना सहा ते सात लाख रुपये मिळाले. त्यांनी बनावट दस्तऐवजावर हा पुरस्कार प्राप्त करून सहा-सात लाखांनी फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंविच्या १२०-ब, ४२०, ४६६, ४६७, ४६८, ४७१ या कलमांतर्गत खटला चालविण्यात यावा, अशी प्रार्थना दारव्हेकर यांनी आपल्या फौजदारी अर्जात केली आहे. न्यायालयात दारव्हेकर यांच्यावतीने अ‍ॅड. योगेशकुमार गोरले हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)