शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इटलीतील कल्पना नागपुरात साकार

By admin | Updated: May 15, 2017 02:33 IST

व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज केवळ ‘चॅटिंग’ आणि ‘मनोरंजना’ साठीच नव्हे, तर ते किती उपयुक्त सुद्धा ठरू शकतात हे परत एकदा दिसून आले आहे.

‘वन टी फ्रॉम वॉल’ उपक्रम : ‘समाजऋण’ व्हॉट्सअ‍ॅप गु्रपचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज केवळ ‘चॅटिंग’ आणि ‘मनोरंजना’ साठीच नव्हे, तर ते किती उपयुक्त सुद्धा ठरू शकतात हे परत एकदा दिसून आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘समाजऋण’ नावाचा डॉ आशिष अटलोए संचालित ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी व उद्योजक असे सदस्य आहेत. या ग्रुपमध्ये इटलीमधील व्हेनिस शहरात असलेल्या कॉफी शॉपचे वर्णन होते. तेथे ‘वन कप कॉफी फ्रॉम वॉल’ हा उपक्रम आहे व त्यात एक कप कॉफी प्यायची व दोन कप कॉफीचे पैसे द्यायचे. एका कपची रिसिप्ट त्या वॉलवर लावली जाते. गरजू व जे कॉफी पैसे देऊन घेऊ शकत नाहीत ते सन्मानाने ‘वन कप कॉफी फ्रॉम वॉल’ अशी आॅर्डर देतात. ही संकल्पना डॉ आशिष अटलोए व संजय पांडे यांना आवडली व ‘समाजऋण’ ग्रुपतर्फे राबवायचे ठरवले. या अभिनव उपक्रमाची सुरुवात १३ मे रोजी साईराम फरसाण, कोतवाल नगर व साईराम फरसाण सोमलवाडा येथून करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पांडे, शिवाजी गायकवाड, डॉ आशिष अटलोए व इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. अनेकदा काही मदत किंवा दान देण्याची इच्छा असते, पण नेमकी संधी मिळत नाही. चहा किंवा स्नॅक्स घेतल्यानंतर आगाऊ पैसे देऊन स्टीकर हॉटेलमधून घ्यायचे व ते स्टीकर पोस्टरवर लावायचे. ज्या गरजूस चहा किंवा स्नॅक्स पाहिजे त्यांनी फक्त ते स्टीकर काढून काऊंटरवर द्यायचे व सन्मानपूर्वक चहा, स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचा. इतका सुटसुटीत हा उपक्रम आहे. गरिबांना व गरजूंना सन्मानपूर्वक अन्न व चहा मिळावा हा यामागचा उद्देश असून जनतेने या उपक्रमास हातभार लावून सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पुढील काही दिवसांत शहरात अन्य हॉटेलमध्येही या उपक्रमाची सुरुवात मोठ्या प्रमाणात करण्यात येईल, असे यावेळी समाजऋण ग्रुपतर्फे जाहीर करण्यात आले. या अभिनव व समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या पूर्वी समाजऋणतर्फे राज्यात पहिली ह्यनेकी की दीवार ह्य हा गरिबांना कपडे मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला होता.