शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

प्रत्येक कलावंतांचा विचार ‘स्वप्नांना पंख नवे’

By admin | Updated: November 30, 2014 00:58 IST

स्टार प्रवाह वाहिनीने आता कात टाकली आहे. स्टार प्रवाह सध्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या नव्या संकल्पनेवर अग्रेसर आहे. या संकल्पनेवरच वाहिनीच्या मालिकांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असून

महिला सशक्तीकरणाचा विचार मांडण्याचा प्रत्येक मालिकांचा प्रयत्ननागपूर : स्टार प्रवाह वाहिनीने आता कात टाकली आहे. स्टार प्रवाह सध्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या नव्या संकल्पनेवर अग्रेसर आहे. या संकल्पनेवरच वाहिनीच्या मालिकांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असून ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी स्टार प्रवाह महिला सशक्तीकरणावर भर देत आहे. त्यामुळे वाहिनीवरील प्राईम टाइममधील मालिकांत महिला पत्रकार, पोलीस, अ‍ॅडव्होकेट, सून आदी पात्रांवर आधारित आहेत. लोकमत समूहाच्यावतीने आयोजित धमाल दांडिया स्पर्धेत परीक्षकांच्या भूमिकेत राहण्यासाठी आलेल्या स्टार प्रवाहच्या कलावंतांनी याप्रसंगी लोकमतशी खास संवाद साधला. यात दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे, जुई गडकरी यांचा सहभाग होता. जयेश पाटील स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील यावेळी म्हणाले, स्टार प्रवाहची टॅगलाईनच ‘स्वप्नांना पंख नवे’ अशी आहे. या टॅगशी वाहिनीवरील सर्व मालिकांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्टार प्रवाहच्या प्रारंभापासून वाहिनी काहीतरी वेगळे करण्यास इच्छूक होती. यात मराठी कथाबीज आणि दर्जा राखणे हे आव्हान होते. आमच्या चमूने काम सुरू केले आणि त्यावर एकापेक्षा एक कल्पना मिळाल्यात. वाहिनीवरील ‘जयोस्तुते’ असो वा ‘लक्ष्य’ ही मालिका, यात प्रमुख भूमिकेत महिला असणार आहे. प्रत्येक मालिका सत्य घटनांवर आधारित आहे. यात विदर्भातील कथांनाही मालिकेत स्थान देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करण्यात आला आहे. गुन्हे प्रकरणाशी संबंधित मालिकेत आम्ही अक्कू यादव प्रकरणाचाही अभ्यास करीत आहोत, असे ते म्हणाले. महेश कोठारे ‘जयोस्तुते’ मालिकेचे निर्माता महेश कोठारे यांची ओळख देण्याची रसिकांना गरज नाही. जयोस्तुते मालिका एका महिला वकिलावर आधारित आहे. ही महिला केवळ एक रुपयात न्यायालयात अन्यायाविरुद्ध लढते. गरीब आणि प्रामाणिक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची तिची भूमिका आहे. मला ही संकल्पनाच खूप आवडली. महागाईच्या दिवसात वकिलाचे शुल्क न देऊ शकणाऱ्या गरिबांना न्याय कसा मिळत असेल, हा प्रश्नही मनात आला. बस...या संकल्पनेवर मालिका मनात आली आणि मी जयेश पाटील यांना भेटलो. त्यांनाही ही संकल्पना खूप आवडली आणि आम्ही काम सुरू केले. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय होते आहे, असे महेश कोठारे यांनी सांगितले. श्वेता शिंदे चित्रपट अभिनेत्री श्वेता शिंदे स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्य’ मालिकेत भूमिका करीत आहे. ११ डिसेंबरपासून श्वेता यात इन्स्पेक्टर रेणुका राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल चार वर्षानंतर श्वेता या भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. त्यांच्या कन्येचा जन्म झाल्याने त्यांनी काही काळ अवकाश घेतला होता. श्वेता म्हणते, या मालिकेत तिचा नागपूरशी संबंध दाखविण्यात आला आहे. त्यामुळेच या मालिकेत अनेक नागपुरी शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. ‘बे’ हा शब्द उच्चारताना बरेच प्रयोग केल्याचेही तिने गमतीने सांगितले. मालिकेतील अनेक स्टंट आपण स्वत: केले असून या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करताना समाधान वाटते, असे ती म्हणाली. जुई गडकरी‘पुढचे पाऊल’ मालिकेत जुई गडकरी हिने कल्याणीची भूमिका साकारली आहे. एका सामान्य सुनेची ही भूमिका आहे. या सुनेची काहीही स्वप्ने नसतात. पण सासूच्या सहकार्याने ती प्रगती करते. सध्या ती फॅशन डिझाईनर झाली आहे. जुई म्हणते, माझ्या अस्सल जीवनापेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. चित्रीकरणाच्यावेळी तर आम्ही खूप मजा करतो. जुईने एमबीए केले असून ती सहायक संचालक म्हणून नोकरीही करीत होती. पण तिला या मालिकेची संधी आल्यावर ती मालिकेत आली. सुरेखा कुडची रुंजी मालिकेतील सुरेखा कुडची सासूची भूमिका वठवित आहे. मीनाक्षी पिटकर नावाच्या या भूमिकेत ती सुनेप्रति अत्यंत नकारात्मक असल्याचे दाखविण्यात आले आहे. सुरेखा म्हणाल्या, खऱ्या आयुष्यात मात्र मी खूप वेगळी आहे. माझ्या मुलाच्या प्रवेशासाठी मी शाळेत गेले तेव्हा शिक्षिकेने मला ओळखले. ती म्हणाली, तुम्ही रुंजीतल्या मीनाक्षी आहात ना..मी तिला हो म्हटले. तेव्हा तिने मात्र मला तुम्ही फार वाईट आहात, असे सांगितले. हे ऐकल्यावर मला हसायलाच आले. पण आपल्या भूमिकेने कुणाला तसे वाटत असेल तर ते त्या भूमिकेचे यश असते. यापुढे मी सकारात्मक भूमिका करणार आहे. पण मला बहुतेक भूमिका नकारात्मक मिळतात. या नकारात्मक भूमिकांनीही माझी स्वतंत्र ओळख निर्माण केली, यात वाद नाही, असे त्या म्हणाल्या.