शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

मला ‘कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष’ व्हायचेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:23 IST

मी ‘ग्लोकल’ लेखक आहे. शेतीपासून तर जागतिक दहशतवादापर्यंत मी लिहिले आहे. मी स्वत:ला प्रेमचंद परंपरेचा पाईक मानतो आणि साहित्याला पुरोगामी विचारांची चळवळ समजतो.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : वैदर्भीय मतदारांना मागितला मतांचा जोगवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मी ‘ग्लोकल’ लेखक आहे. शेतीपासून तर जागतिक दहशतवादापर्यंत मी लिहिले आहे. मी स्वत:ला प्रेमचंद परंपरेचा पाईक मानतो आणि साहित्याला पुरोगामी विचारांची चळवळ समजतो. त्यामुळे मला नुसते संमेलनाध्यक्ष नव्हे तर ‘कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष’ व्हायचे आहे आणि माझ्या या भूमिकेला वैदर्भीय मतदारांचा शंभर टक्के पाठिंबा मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, असा आशावाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला. शनिवारी नागपुरातील विदर्भ साहित्य संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, मी जिल्हाधिकारी असताना कादंबºया लिहिल्या. क्रीडाकथा हा नवा प्रकार मी साहित्यात आणला. हे माझे वाङ्मयीन संचित आहे. या बळावरच मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. कुठल्याही वादात आपण पडायचे नाही, हे पथ्य मी कटाक्षाने पाळले आहे. आपण आपल्याच कामाचे मूल्यमापन करणे योग्य नाही. मला माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांबद्दल सन्मान आहे. मतदार सूज्ञ आहेत. ते योग्यच निर्णय घेतील याचा मला विश्वास आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.मला का नाही मिळणार विदर्भाचा पाठिंबा?मी लिहिताना कधी प्रांताचा भेद पाळला नाही. माझे लेखन सार्वत्रिक आहे, त्यामुळे माझ्या लिखाणावर प्रेम करणारेही सर्वत्र आहेत. त्याला विदर्भ अपवाद नाहीच. येथे दोन उमेदवार आहेत म्हणून मला मते मिळणार नाहीत, हा अंदाज चुकीचा आहे. मी आज वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकरांना भेटलो, इतर मतदारांशीही भेटीगाठी झाल्या. याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसेलच.वयाचा विषयच नाही, लिखाण सकस हवेसंमेलनाध्यक्ष साठीच्या आतला की बाहेरचा, हा विषयच हास्यास्पद आहे. वयाचा आणि लेखनाचा काय संबंध आहे? लिखाण सकस आणि दर्जेदार असायला पाहिजे. मग वय २५ वर्षे असो वा ७० वर्षे यातला कुणीही संमेलनाध्यक्ष होऊ शकतो.