शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:45 IST

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर कळले की ग्रेनाईड बॉम्ब फेकण्यात आला होता, असा थरारक अनुभव आ. सुधीर पारवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितला.

ठळक मुद्देसुधीर पारवे यांनी सांगितला थरार : जम्मू-काश्मीरमध्ये बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईड  हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर कळले की ग्रेनाईट बॉम्ब फेकण्यात आला होता, असा थरारक अनुभव आ. सुधीर पारवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितला.पारवे म्हणाले, विक्रम काळे, तुकाराम काथे, किशोर पाटील, दीपक चव्हाण या चार आमदारांसह आपण पहेलगामवरून श्रीनगरला निघालो; सोबत समितीचे सचिव विलास आठवले व जम्मू सरकारचेही अधिकारी होते. अनंतनाग जिल्ह्यातील बीजबिहारा या गावात गाड्या पोहोचल्या. दोन्ही बाजूला दुकाने होती. बाजारातून आमचा ताफा वेगाने पुढे जात होता. एवढ्यात मागे जोरात गाडीचा टायर फुटल्यासारखा आवाज झाला. पुढे गाड्या थांबल्यावर माहीत पडले की मागे ग्रेनाईटचा स्फोट झाला व काही लोक जखमी झाले. यामुळे काही गाड्यांचे टायर फुटले. एका शासकीय वाहनाचे नुकसान झाले. यात गावातील काही लोक जखमी झाले. सुदैवाने आमच्यापैकी कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर आम्ही श्रीनगर गाठले व तेथील प्रशासनाला याची माहिती दिली. २६ रोजी समिती महाराष्ट्रात परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSudhir Parveसुधीर पारवे