शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांच्या प्रेमावर मी भाळलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:10 IST

Nagpur News रिऍलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले.

ठळक मुद्दे‘बिगबॉस उपविजेता’ राहुल वैद्य भरपूर पाठिंबा दिल्याने व्यक्त केले आभार

अंकिता देशकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात जन्मलेला प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने बहुचर्चित रिऍलिटी शो ‘बिगबॉस १४’चे उपविजेतेपद पटकावले आहे तर दूरचित्रवाणी अभिनेत्री रुबिना दिलैक हिने विजेतेपद पटकावले. राहुलने प्राप्त केलेल्या या यशानंतर ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला.

रिऍलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले. विजेतेपद प्राप्त झाले नाही, हे शल्य नक्कीच राहील. पण, जिंकणे हाच एक हेतू बिगबॉसच्या घरात जाण्याचा नव्हता. मी तेथे होतो, ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रेम आणि पाठबळ मिळविणे, हा हेतू होता आणि मी असाच घडलो आहे, हे त्यातून सिद्ध झाले. ग्रॅण्ड फिनालेमध्ये माझे कुटुंब सहभागी झाले, त्याचा अत्यानंद आहे.

बिगबॉस हाऊसमध्ये असताना अस्वस्थताही होती. सर्वत्र लागलेल्या कॅमेऱ्यांनी खासगी आयुष्य असे राहिलेच नव्हते आणि त्यामुळेच बऱ्याच गोष्टी अनियमित होत होत्या आणि पुरेशी झोपही होत नव्हती, असे राहुल म्हणाला. माझे आजी-आजोबा नागपुरातच राहतात आणि त्यामुळेच मी शहराला वारंवार भेट देत असतो. नागपूरकरांकडून मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील काही रेस्तराँनी माझ्यासाठी विशेष मोहीम राबवल्याचे कळले. राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना या रेस्तराँनी दिली होती. असे प्रेम मिळत असेल तर आणखी काय हवे, असा कृतज्ञतापूर्वक प्रतिप्रश्न राहुलने यावेळी व्यक्त केला. या शोचा ऍकर सलमान खान याच्यासोबतच अनुभव अतिशय खास ठरला. त्याने सगळ्यांचे आदरातिथ्य केले आणि सर्वांना सहज वाटेल अशी वातावरणनिर्मितीही केली होती.

ग्रॅण्ड फिनालेच्या समाप्तीनंतर सलमान खानने आईवडिलांसोबत एका खासगी पार्टीत भरपूर वेळही घालविल्याचे राहुल म्हणाला. भविष्यात संधी मिळाली तर सलमान खानसोबत काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मित्र आणि सर्वांसाठी चहा बनविण्याच्या प्रसंगाची खूप आठवण येते. भविष्यात आता कामावर लक्ष केंद्रित करण्यासेाबतच नव्या गाण्यांच्या प्रदर्शनाचा विचार करणार असून, आई-वडील, कुटुंबीय व गर्लफ्रेण्डसोबत भरपूर वेळ घालविणार असल्याचे राहुल म्हणाला. रिऍलिटी शो हा स्क्रिप्टेड असतो, हा केवळ भ्रम आहे. घरात घडणारी प्रत्येक घटना ही सत्य व अचानक घडणारी असल्याचेही राहुलने सांगितले.

राहुल वैद्यला मत द्या आणि विशेष सवलत मिळवा, अशी ऑफर ग्राहकांना नागपुरातील रेस्तराँनी दिली होती, ही आठवण यावेळी राहुल वैद्य याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :rahul vaidyaराहुल वैद्य