शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

निळा झेंडा मान्य असेल तरच मी येतो, नाही तर जातो - रामदास आठवले

By प्रविण खापरे | Updated: October 16, 2022 16:17 IST

डॉ. प्रशांत वैजनाथ यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान

नागपूर : ‘डॉ. बाबासाहेबांवर अन्याय झाला म्हणून त्यांनी धर्मपरिवर्तन केले होते. अन्याय झाला नसता तर त्यांनी धर्मांतरण केले नसते.’ या माझ्या वाक्याचा अनर्थ करत ‘बाबासाहेबांना बुद्ध धम्म स्वीकारायचा नव्हता’ असे वाक्य माझ्या तोंडी कोंबण्यात आले आणि सर्वत्र माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला आहे. मी कुठेही जाताना निळा झेंडा मान्य असेल तरच येतो, नाही तर जातो. मी बुद्धीस्ट आहे आणि माझा विरोध करणाऱ्यांनी विचार करणे आवश्यक असल्याची भावना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केली.रविवारी मारवाडी फाऊंडेशन नागपूरच्यावतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग शल्य चिकित्सक व कोवई मेडिकल सेंटर आणि हॉस्पिटल कोईम्बतूरचे संचालक डॉ. प्रशांत वैजनाथ यांना रामदास आठवले यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार अजय संचेती होते तर व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. निकुंज पवार, फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. आनंद संचेती, कीर्ती गांधी, महेश बंग, डॉ. मधुकर वासनिक आदी उपस्थित होते.

आपल्या मिश्किल स्वभावाप्रमाणे रामदास आठवले यांनी भाषणाची सुरुवात ठमकेबाज कोटीयुक्त काव्यमय ओळींनी केली. डॉक्टरांना उद्देशून ‘आप लोगों को बचाते है, हम अपने अपोझिशन वालो को नचाते है’ असे वक्तव्य केले. तर भाजपाला उद्देशून ‘काही बाबतीत तुम्ही आम्हाला जम नाही. पण, तुम्हाला आमच्याशिवाय करमत नाही’ अशी कोटी केली. ‘मी तामिळनाडूला नेहमी येतो. पण, माझे हृदय बंद पडले नाही म्हणून तुम्हाला भेट नाही’ अशी विनोदी भावना त्यांनी डॉ. वैजनाथ यांना उद्देशून केली.

संविधान सगळ्यांनीच स्वीकारला असला तरी विचार आत्मसात करण्याची गरज असून आंतरजातीय विवाहांनीच समाजात एकजूटता येईल, अशी भावनाही रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखवली. डॉ. वैजनाथ यांच्यासाठी पद्म पुरस्कारसाठी मी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर परिचय डॉ. निकुंज पवार यांनी करवून दिला. संचालन स्मिता खनगई यांनी केले.वैद्यकीय क्षेत्रात कोटा नको तर गुणवत्ता हवी - डॉ. वैजनाथदेशात वैद्यकीय क्षेत्रात खासगी हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. परंतु, यात कोटा सिस्टम घातक ठरत असून मेरीटनुसारच प्रवेश देणे गरजेचे आहे. आता धार्मिक आणि जातीय समीकरणाच्या पलिकडे जाऊन विचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रकाश वैजनाथ यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले