शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जे वाट्याला आलं, ते जीव ओतून साकारलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:13 IST

‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.

ठळक मुद्दे रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. याच भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय बाफ्टा पुरस्कार प्राप्त करणाºया त्या एकमेव भारतीय कलावंत आहेत. पण वयाच्या २७ व्या वर्षी ही भूमिका साकारल्यानंतर वृद्ध कलावंताचा शिक्का लागला. पुढे याच प्रकारच्या भूमिका आॅफर होऊ लागल्या. धर्मेंद्र, मिथूनपासून अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिका येत गेल्या व त्या जीव ओतून साकारत गेल्या. ‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.‘गांधी’ची कस्तुरबा असो, महेश भट्ट यांच्या ‘सारांश’मधील पार्वती असो की ‘अग्निपथ’मधील अमिताभची आई असो, व्यावसायिक, समानांतर सिनेमा, नाटक अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या जिवंत व दमदार अभिनयाने रोहिणी हट्टंगडी यांनी रसिकांच्या मनात कायम स्थान निर्माण केले आहे. आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी आपला कलापट प्रेक्षकांसमोर मांडला. ही महोत्सवाची समारोपीय मुलाखत होती. चित्रपटापेक्षा नाटकांची आवड असलेल्या रोहिणी यांनी जयदेव हट्टंगडी यांच्या दिग्दर्शनात ‘अविष्कार’ हे नाटक केले. यातील ‘चांगुणा’च्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट स्टेट ड्रामा फेस्टिव्हलमध्ये पुरस्कृत करण्यात आले. अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’साठी भक्ती बर्वे व स्मिता पाटील यांच्यामधून कस्तुरबासाठी त्यांची निवड झाली. गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ या समानांतर चित्रपटातील भूमिकेसाठी सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी प्राप्त केला.जपानचा ‘काबुकी’ हा एकपात्री प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव भारतीय तर कन्नडच्या ‘यक्षगान’ हा प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव महिला कलावंत आहेत. येत्या काळात ‘आजीची पोतळी’ ही वेबसिरीज व शेफ विष्णू मनोहर यांच्या ‘वन्स मोअर’मधील पुरुष भूमिकेबाबत त्यांनी माहिती दिली.रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलाखतीनंतर चीनच्या ‘फ्री अ‍ॅन्ड इजी’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सहायक आयुक्त रवींद्र देवतळे यांच्यासह आयोजनातील आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे आयोजक सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजय उगेमुगे, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर, नितीन सहस्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, विकास लिमये, रवींद्र डोंगरे, अजेय गंपावार, प्रमोद कळमकर, मिलिंद मराठे आदी उपस्थित होते.

महोत्सवात ३१ चित्रपट सादरमहोत्सवात ३१ चित्रपट सादर करण्यात आले. यामध्ये ७ मराठी व हिंदीसह इतर भाषिक चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय २९ शॉर्ट फिल्म्सही प्रदर्शित करण्यात आल्याचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

फाऊंटेनच्या विकासात ‘टेंडर’ आडवे येते : गडकरीतेलंगखेडी येथे आंतरराष्ट्रीय संकल्पनेतील म्युझिकल फाऊंटेन साकारण्याची योजना आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यावर काम करीत असून त्याचे साहित्य विदेशातून येणार आहे. मात्र सरकारी धोरणानुसार ‘टेंडर’ काढण्याची सूचना वारंवार केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प रखडत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. मात्र हा प्रकल्प पूर्ण करूच असा विश्वास त्यांनी दिला. नागपूर व विदर्भ साहित्य, कला, संस्कृतीच्या क्षेत्रात कमी पडतोय ही खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रपटांचे चित्रीकरण विदर्भात व्हावे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हावे, चित्रपट व कला, संस्कृतीला चालना मिळावी ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :cultureसांस्कृतिक