शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील हायप्रोफाईल महिला चोर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 13:22 IST

पारशिवनीत राहणारी पिंकी उच्चशिक्षित आहे. तिने एमएड केले आहे. ती फर्राटेदार इंग्रजी बोलते. तिचे उच्चभ्रू महिलेसारखे राहणीमान पाहून ती चोरटी आहे, असा कुणी संशयही घेऊ शकत नाही.

ठळक मुद्देसापडला २१ लाखांचा ऐवजतब्बल १४ गुन्ह्यांची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सराफा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी फिरून संधी मिळताच महिलांच्या पर्समधील दागिने, रोकड लंपास करणाऱ्या एका हायप्रोफाईल चोरट्या महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. पौर्णिमा ऊर्फ पिंकी वासुदेव कामडे (वय २५) असे तिचे नाव आहे.पारशिवनीत राहणारी पिंकी उच्चशिक्षित आहे. तिने एमएड केले आहे. ती फर्राटेदार इंग्रजी बोलते. तिचे उच्चभ्रू महिलेसारखे राहणीमान पाहून ती चोरटी आहे, असा कुणी संशयही घेऊ शकत नाही. मात्र, उच्चशिक्षित पिंकीने नोकरी अथवा रोजगाराची वाट न धरता हातसफाई सुरू केली. पिंकी अगदी चालता चालताच पर्समधून बेमालूमपणे दागिने, रोकड लंपास करते. ११ जानेवारीला दुपारी इतवारी सराफा बाजारात झिंगाबाई टाकळीतील अमन इंगोले हे त्यांची आई सुनंदा यांच्यासोबत आले. त्यांनी सोन्याची साखळी आणि पदक विकत घेतले आणि पायी रस्त्याने निघाले. पिंकीने मोठ्या सफाईने सुनंदा यांच्या पर्समधील दागिन्याची पर्स लंपास केली होती.अमन इंगोलेंच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १४ जानेवारीला पुन्हा पिंकीने अशीच एक चोरी केली मात्र पळून जाताना नागरिकांनी पिंकीला पकडले. तिच्या पर्समध्ये चोरीचे दागिने आढळले. त्यानंतर पोलिसांनी पिंकीला अटक करून तिच्या पारशिवनीतील घरी धडक दिली. तिच्या घरझडतीत घबाडच हाती लागल्याने पोलीसही चक्रावले. चक्क ६०९ ग्राम सोन्याचे दागिने, रोख, मोबाईल, हातघड्याळ असा एकूण २१ लाख, १५१२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तिने गुरुवारपर्यंतच्या चौकशीत एकूण १४ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात तहसील ठाण्यातील ८, सीताबर्डीतील ५ आणि रामटेकमधील एक गुन्हा आहे.

सीताबर्डी पोलिसांकडून तपासझटक्यात हजारो रुपये हाती पडत असल्याने चोरी करण्याचे व्यसनच पिंकीला जडले होते. ती पॉश कपडे घालून पारशिवनीहून नागपुरात यायची. कधी सीताबर्डी तर कधी इतवारी परिसरातील सराफा बाजारात फिरायची आणि हात मारल्यानंतर गावाला परत जायची. तहसील पोलिसांकडून पिंकीचा पीसीआर संपल्यानंतर तिला आता सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी