शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

१६० वर्षे जुन्या दार्जिलिंग वृक्षारोपणातून आले हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:01 IST

तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु कोरोना संसर्गावर प्रभावी असल्याचे मानले जाणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध हे उत्तर-पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दार्जिलिंगजवळील १६० वर्षे जुन्या वृक्षारोपणातून आले आहे.

ठळक मुद्दे सिंचोना वनस्पतीची साल : किमतीत १०० टक्क्यांची वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनवी दिल्ली : तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, परंतु कोरोना संसर्गावर प्रभावी असल्याचे मानले जाणारे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध हे उत्तर-पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दार्जिलिंगजवळील १६० वर्षे जुन्या वृक्षारोपणातून आले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणल्यानंतर आतापर्यंतची गोपनीय माहिती समोर आली आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन जे मुळात क्विनाईन सल्फेट असून ते सिंचोना वनस्पतीच्या झाडाच्या सालातून काढण्यात आल्याचे दार्जिलिंगजवळील हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन प्रकल्पातील वैज्ञानिकांचे मत आहे. वर्षातून एकदा या पिकाची कापणी केली जात असल्याने सिंचोना सालीचा पुरवठा मर्यादित आहे. म्हणूनच या औषधाच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती, असे या वैज्ञानिकांनी सांगितले.टंचाईमुळे मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील क्विनाईन उत्पादक औषध कंपन्यांकडून सिंचोनाच्या सालीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोविड-१९ साथीच्या आजाराचा प्रसार होण्यापूर्वी सिंचोनाची साल ११० रुपये प्रतिकिलो दराने विकली जायची; मात्र आता किंमत १०० टक्क्यांनी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.सिंचोनाच्या औषधी गुणधर्मांची माहिती असलेल्या ब्रिटिश शासकांनी प्रथम सिंचोना बियाणे १८६१ मध्ये कोलकाता येथील रॉयल बॉटनिकल गार्डनमध्ये पाठविले. त्यावेळी कोलकाता येथे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी १८६४ मध्ये दार्जिलिंगजवळील ६९०० एकर जमिनीवर सिंचोना वृक्षारोपण केले. सिंचोनाचा उगम पेरू येथे आहे, जिथे त्याला किनाकिना वनस्पती म्हणतात. पूर्वी पेरूच्या इंका राज्यकर्त्यांना किनाकिनाच्या औषधी वापराची माहिती होती. त्याला स्पॅनिश भाषेत सीना तर त्याचे अंगीकृत रूप सिंचोना म्हणून ओळखले जाऊ लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicinesऔषधं