शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 14:55 IST

Nagpur News पत्नीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून आत्महत्या केली होती.

ठळक मुद्दे पत्नीने केली होती आत्महत्याएमआयडीसीतील घटना, परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पत्नीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोद किशोरीलाल महतो (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.हिंगणा मार्गावरील पंचशिल नगरात राहणारा प्रमोद सफाई कर्मचारी होता.

त्याच्या पत्नीने महिनाभरापूर्वी घरगुती कारणावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासून प्रमोद कमालीचा अस्वस्थ राहायचा. त्याच्या घरच्यांनी आणि मित्रमंडींनी त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, पत्नीच्या विरहात कासाविस झालेल्या प्रमोदची मानसिक स्थिती सारखी बिघडतच गेली.

या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास प्रमोदने गळफास लावून घेतला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. प्रमोदचा मोठा भाऊ मनोज (वय ३५) याने दिलेल्या माहितीवरून एमआयडीसीचे एएसआय घाटे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

टॅग्स :Suicideआत्महत्या