शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पती-पत्नीने हरविले कोरोनाला : मेडिकलने टाळ्या वाजवून दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 20:30 IST

‘कोविड-१९’ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्णालयातून घरी जाणे हे त्या रुग्णांसाठी व रुग्णालयासाठी गौरवाची बाब. म्हणूनच रुग्णालयातून बरे होऊन जाताना डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्या दाम्पत्याला निरोप दिला.

ठळक मुद्देबरे झालेल्या रुग्णांची संख्या १४

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्णालयातून घरी जाणे हे त्या रुग्णांसाठी व रुग्णालयासाठी गौरवाची बाब. म्हणूनच रुग्णालयातून बरे होऊन जाताना डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्या दाम्पत्याला निरोप दिला, तर त्यांनीही टाळ्या वाजवून प्रतिसाद देत रुग्णसेवेबाबत आभार व्यक्त केले.इंडोनेशियाहून दिल्ली व नंतर नागपूर विमानतळावर आलेल्या या दाम्पत्याला २२ मार्च रोजी आमदार निवासात क्वारंटाइन केले. चंद्रपूर येथील रहिवासी असलेले हे ३९ वर्षीय पती व ३२ वर्षीय पत्नीला कोणतीच लक्षणे नव्हती. घरी जाण्यापूर्वी आपण आपली तपासणी करू या, असे म्हणून १३ व्या दिवशी पतीने आपले नमुने तपासणीसाठी पाठविले. ६ एप्रिल रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना धक्काच बसला. त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचे नमुने तपासले, त्यासुद्धा पॉझिटिव्ह आल्या. या दाम्पत्याला मेडिकलमध्ये दाखल केले. पहिल्या पाच दिवसानंतर व १४ दिवसानंतर २४ तासांच्या अंतराने घेतलेले सर्व नमुने निगेटिव्ह आले. यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या रुग्णांसह मेडिकलमधून नऊ तर नागपुरातून १४ रुग्ण बरे झाले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-१९’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. या दोन्ही रुग्णांना निरोप देण्यास स्वत: डॉ. मित्रा, डॉ. गावंडे, डॉ. मोहम्मद फैजल, डॉ. कांचन वानखेडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. जयेश मुखी, मेट्रन मालती डोंगरे, सीएमओ डॉ. चेतन वंजारी, डॉ. विपुल मोदी व डॉ. श्याम राठोड उपस्थित होते.रुग्णालयातून निरोप देण्यापूर्वी पती-पत्नीने सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णसेवेची प्रशंसा केली. विशेष म्हणजे, या दाम्पत्यासोबत आणखी तीन दाम्पत्य होते. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आमदार निवासातून चंद्रपूरला पाठविण्यात आले. हे दाम्पत्यही चंद्रपूरसाठी रवाना झाले असून पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय