शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केली वन अधिकाऱ्याची ‘शिकार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:45 IST

सायबर गुन्हेगारांनी डेबिट कार्ड रिन्युव्हल करण्याच्या नावावर एका वन अधिकाऱ्याला पावणेदोन लाख रुपयाचा चुना लावला.

ठळक मुद्देडेबिट कार्ड नुतनीकरणाच्या नावावर १.७५ लाख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी डेबिट कार्ड रिन्युव्हल करण्याच्या नावावर एका वन अधिकाऱ्याला पावणेदोन लाख रुपयाचा चुना लावला.ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली. डॉ. श्रवण शरद श्रीवास्तव हे भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. ते ४ डिसेंबर रोजी आपल्या रविनगर येथील कार्यालयात हजर होते. त्यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. त्याने डॉ. श्रीवास्तव यांना त्यांचे डेबिट कार्ड नुतनीकरण करायचे असल्याचे सांगत त्यांच्याकडून डेबिट कार्डबाबत सर्व माहिती घेतली. त्यानंतर लगेच श्रीवास्तव यांच्या खात्यातून १ लाख रुपये लंपास केले. खात्यातून पैसे कटल्याचा एसएमएस सुद्धा त्यांना आला नाही. दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यातून पुन्हा ७५ हजार रुपये काढण्यात आले. त्यावेळी त्यांना एसएमएस आल्याने त्यांनी लगेच बँकेला विचारणा केली. तेव्हा त्यांच्या खात्यातून युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून रक्कम काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिल्लीतील सायबर टोळीचा हात असल्याचे सांगितले जाते.न्यायाधीश, अधिकाऱ्यांसह अनेकांना फसविलेमागील काही दिवसात सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारांची टोळी बँकेचे अधिकारी बनून लोकांना फसवित आहेत. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यासह अनेकांना या टोळीने फसविले आहे. या प्रकरणात पोलिसांची एक चमू दिल्लीला पाठवण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमforest departmentवनविभाग