शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘हंजर’चा कोट्यवधीचा घोटाळा; चौकशीसाठी नागपूर मनपा विधी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 22:56 IST

नागपूर शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ कंपनीने कामात दिरंगाई करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे.

ठळक मुद्देविधी समितीचा निर्णय : चौकशीनंतर कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून निघणाऱ्या कचऱ्यावर भांडेवाडी येथे प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ कंपनीने कामात दिरंगाई करून कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. यात मनपाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.हंजरच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचा प्रश्न अनेकदा सभागृहात आला होता. सभागृहाने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव विधी समितीकडे पाठविला होता. त्यानुसार समिती चौकशी करणार आहे. या समितीत धर्मपाल मेश्राम यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, जयश्री वाडीभस्मे आदींचा समावेश आहे.बैठकीला उपसभापती अ‍ॅड. मीनाक्षी तेलगोटे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, शकुंतला पारवे, सुमेधा देशपांडे, मनिषा धावडे, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे, विजय हुमने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.कचरा कंत्राटाचा अहवाल सादर कराकचरा संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या बी.व्ही.जी. आणि ए.जी. एन्व्हायरो या दोन्ही कंपन्यांनी निविदेची कायदेशीर परिपूर्तता केली आहे का,याबाबतचा आढावा घेण्यात आला. कार्यादेश देण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे का, कचरा संकलनाबाबत प्रशासन समाधानी आहे काय, कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि कार्यपद्धती यासंदर्भात नेमकी मनपाची भूमिका, कामात सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने निविदेमधील अटी व शर्तींचा अभ्यास करून अहवाल समितीपुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.‘आशा’च्या रिक्त जागा भरानागपूर शहरात असलेल्या आशा वर्कर, त्यांची नियुक्ती आदीसंदर्भात समितीने माहिती जाणून घेतली. ५२२ आशा ची पदे मंजूर असून सध्या ४९८ आशा कार्यरत आहेत. उर्वरित २४ जागा तातडीने भरण्याचे निर्देश देतानाच ही संख्या पुरेशी आहे काय, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी २ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे निर्देशही सभापतींनी आरोग्य विभागाला दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार