शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पानठेला चालकांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:54 IST

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याातील पान विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचे संकट ठाकले आहे. मागील जवळपास पाच महिन्यापासून शहरातील सर्वच पान शॉप बंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांपुढे आज जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदुकाने उघडण्याची परवानगी द्या : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्याातील पान विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीचे संकट ठाकले आहे. मागील जवळपास पाच महिन्यापासून शहरातील सर्वच पान शॉप बंद आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांपुढे आज जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नागपूर शहरामध्ये सुमारे १५ हजारांवर पानठेले, पान शॉप आहेत. यातून या सर्वांच्या कुटूंबांची गुजराण चालते. नागपुरात १८ मार्चच्या सायंकाळपासून हा व्यवसाय बंद आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या कारणावरून प्रशासनाने हा निर्णय घेतला. या व्यावसायिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. दरम्यानच्या काळात अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये सर्वच दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळाली. नियम अटींचे पालन करून अन्य व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र या व्यावसायिकांना अद्यापही प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. आजवर या व्यावसायिकांनी बरीच कळ सोसली. मात्र पाच महिन्यांचा काळ लोटूनही हा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश नाहीत. यामुळे सर्वासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पान शॉप विक्रेता महासंघाचे अध्यक्ष राहुूल भूरे, उपाध्यक्ष सचिन गभणे, सचिव प्रमोद गुल्हाणे आणि अन्य पदाधिकारी जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त राम जोशी यांना भेटले. त्यांच्यासमोर व्यथा मांडून निवेदनही दिले. आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली. अन्य व्यावसायिकांसारखेच सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याची हमीही दिली. मात्र अद्यापही कसलाच निर्णय न झाल्याने हे व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटात पडले आहेत.उदरनिर्वाहासाठी मानधन द्यामागील पाच महिन्यापासून व्यवसाय ठप्प आहे. घरात काहीच पैसा नाही. जगण्याचे अन्य साधन नाही. कुटुंबाचे हाल सुरू आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्याला परवानगी द्यावी. किंवा या काळामध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी १० ते १५ हजार रुपयांची दरमहा मदत करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर