शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर शेकडो अपघात; नागरिकांची सुरक्षा धोक्यात

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 20, 2023 17:57 IST

हायकोर्टात जनहित याचिका

नागपूर : अतिक्रमणामुळे इसासनी रोडवर गेल्या दहा वर्षात शेकडो अपघात झाले असून त्यात १२ व्यक्तीना प्राण गमवावे लागले. या रोडचा उपयोग करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा सतत धोक्यात असते. परिणामी, चार नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

जितेंद्र मेश्राम, सतीश कान्हेलकर, मंगेश लोखंडे व देवेंद्र दायरे, अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मंजूर आराखड्यानुसार लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी हा रोड १८ मीटर रुंद आहे. या रोडवर महाविद्यालय, रुग्णालय यासह विविध प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे रोडवर नेहमीच वर्दळ असते. गेल्या १५ जुलै रोजी रोडचे विकास काम सुरू करण्यात आले. परंतु, अतिक्रमणामुळे १८ ऐवजी केवळ १३ मीटर रुंद रोड बांधला जात आहे. काही ठिकाणी हा रोड ९ मीटरपर्यंत अरुंद करण्यात आला आहे. परिणामी, हा रोड अपघाताला निमंत्रण देत आहे. बरेचदा गंभीर रुग्ण व विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकतात, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

कोणीच दखल घेतली नाही

मंजुर आराखड्यानुसार रोड बांधला जावा, यासाठी डिगडोह जागृती मंचाच्यावतीने वेळोवळी आंदोलने करण्यात आली. मंचाने केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व डिगडोह ग्रामपंचायत यांना निवेदने सादर करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. परंतु, कोणीच दखल घेतली नाही. रोडवरील अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अश्विन इंगोले बाजू मांडणार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयAccidentअपघातHigh Courtउच्च न्यायालय