शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शेकडो ओबीसी बांधव २५ डिसेंबरला स्वीकारणार बौद्ध धम्म; दीक्षाभूमीवर सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:01 IST

येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.

ठळक मुद्देपरिवर्तनातून स्वीकारला बुद्धाचा मार्ग

आॅनलाईन लोकमतनागपूर : ओबीसी बांधव बौद्ध धम्माकडे आरक्षणाचे आमीष किंवा ‘ब्रेन वॉशिंग’ केल्यामुळे वळले नाही. आधी बाबासाहेब आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि पटलं म्हणून त्याचा स्वीकार करतो आहोत. बौद्ध धम्माइतके सुस्पष्ट समतावादी तत्त्वज्ञान जगात कुठेही नाही व त्याच मार्गाने आम्हाला जावे लागणार आहे. या परिवर्तनातूनच ओबीसी बांधव धम्माचा स्वीकार करीत आहेत, अशी भावना प्रा. रमेश राठोड यांनी व्यक्त केली.येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील बंजारा, हलबा, मातंग, तेली, माळी, कुणबी, अग्रवाल अशा विविध जातींमधील ओबीसी बांधवांचा समावेश आहे. प्रा. राठोड यांनी नागपुरात दीक्षाभूमीवर होणाऱ्या या दीक्षा समारोहाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. दुपारी १२ वाजता धम्मदीक्षा समारोहापूर्वी संविधान चौकाकडून दीक्षाभूमीकडे धम्मरॅली काढली जाईल. त्यानंतर २ वाजता प्रत्यक्ष दीक्षा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व महाबोधी महाविहार मुक्ती संग्रामाचे धम्मसेनानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व लद्दाखचे भदंत संघसेना हे ओबीसी बांधवांना धम्माची दीक्षा देतील. यावेळी प्रा. जैमिनी कडू, डॉ. रुपाताई बोधी-कुळकर्णी, संतोष भालदार व हरिकिसनदादा हटवार आदी मान्यवर परिवर्तित बौद्धांचे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत बुद्धभूमी येथे याचवेळी हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही ओबीसी बांधवांच्या धर्मांतरास पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.कीर्तनातून बुद्ध सांगणारे हरिकिसनदादाहरिकिसनदादा हटवार कीर्तनकार व भारुडकार म्हणून प्रसिद्ध होते. वारकरी म्हणून कार्य करताना बुद्धाची ओळख पटली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीत सामील झाले. पुढे त्यावर सखोल अभ्यास करून १९६७ साली संपूर्ण कुटुंबासह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून भारुड कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बुद्धाचे तत्त्वज्ञान लोकांना सांगत आहेत. अनेक वेळा लोकांनी दगडही मारले. आता मात्र त्यांना माझे सांगणे पटत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७