शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दीड लाख घरात होणार कुष्ठरोग सर्वेक्षण; ४२४ तज्ज्ञांची टीम नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 21:18 IST

प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत ५ ते २०  सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत ५ ते २०  सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.अंतर्गत नागपूर शहरातील दीड लाख घरातील तब्बल ७ लाख ५८ हजार व्यक्तींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे.

नागपूर, दि. 5 - प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत ५ ते २०  सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.  या अंतर्गत नागपूर शहरातील दीड लाख घरातील तब्बल ७ लाख ५८ हजार व्यक्तींचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी ४२४ तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. 

या शोध मोहिमेदरम्यान संशयित कुष्ठरुग्णांच्या शरीराच्या  ६० टक्के भागाची तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरोग रुग्ण आढळल्यास त्यावर मोफत औषधोपचार करण्यात येणार असून कुष्ठरोग निर्मुलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येतील. या सर्वेक्षणासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यात येणार आहे.

मोहिमेचा शुभारंभ करताना महापौर जिचकार म्हणाल्या, समाजातील कुष्ठरुग्णांना शोधून त्यांना बहूविध औषधोपचाराने बरे करायचे आहे. याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे.  नागरिकांनी स्वत:मध्ये कुष्ठरोग आजाराविषयी लक्षणे वाटल्यास रुग्णालयामध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी महापालिकेचे अप्पर आयुक्त रविंद्र कुंभारे, उपसंचालक डॉ. संजय जायसवाल,  आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिवाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर,  विशेष कार्य अधिकारी  डॉ. विजय जोशी,  वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर, डॉ. अनंत हजारे, डॉ. हेमलता वर्मा आदी उपस्थित होते