शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:28 IST

बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी दोन हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षीही या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी पहिल्याच दिवशी दोन हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशात एक नवी धम्मक्रांती केली होती. या ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी यांच्यावतीने बौद्ध दीक्षा-विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्मगुरु भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० वर श्रामणेर व दोन हजार अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. यावेळी श्रामणेर झालेल्यांना चिवर दान देण्यात आले. दीक्षा देण्याचा हा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भदन्त सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत अनुयायांना दीक्षा दिली जात आहे.प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनुयायांना २२ प्रतिज्ञाचे वाचन करावयास लावले. श्रामणेर यांना पंचशीलचे महत्त्व सांगून ते आत्मसात करण्यास सांगण्यात आले. गुरुवारी श्रामणेरची दीक्षा घेतलेल्यांमध्ये १२ वर्षीय मुलापासून ते ५५ वर्षीय अनुयायांचा समावेश होता. धम्म दीक्षा घेण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, चेन्नई, कोलकाता, मराठवाडा, नाशिक, मुंबई व महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून लोक आले आहेत. दीक्षेच्या या कार्यक्रमात स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे परिश्रम घेत आहेत.