शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनात प्रचंड त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, आदींसाठी बार्टी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, आदींसाठी बार्टी व सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ची स्थापना करण्यात आली; परंतु ‘महाज्योती’द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या नियोजनातच त्रुटी असल्याने एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पीएच.डी.धारक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी आयोजित प्रवेशपूर्व कोचिंग घेणारे विद्यार्थी असोत की यूपीएससीचे विद्यार्थी; या सर्वांकडून ‘महाज्योती’च्या संचालनकर्त्यांवर ठपका ठेवण्यात येत आहे.

काय आहेत पीएच.डी.धारकांचे प्रश्न?

१) महाज्योतीने संशोधन करण्यासाठी जाहिरात काढली. त्यात अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० मे होती. लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्र गोळा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे. सारथीने मुदतवाढ दिली; पण महाज्योतीने अजूनही दिली नाही.

२) महाज्योती केवळ २०१९ मध्ये नोंदणी केलेल्या पीएच.डी.धारकांनाच लाभ देणार आहे. विद्यार्थ्यांची मागणी आहे की, त्यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश करावा.

३) सारथीमध्ये संशोधनासाठी ५०० जागा आहेत; पण महाज्योतीत व्हीजेएनटी व ओबीसीचा समावेश असताना केवळ १५० जागा उपलब्ध केल्या आहेत. या जागा अपुऱ्या असून किमान ७०० जागा कराव्यात.

४) बार्टी आणि सारथीएवढेच पीएच.डी.धारकांना विद्यावेतन द्यावे.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही अपुरेच

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १० हजार युवकांना देण्यात येणार होते. चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केवळ १०० विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण देणाऱ्यांना अनुभव नाही. पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रोजेक्ट मॅनेजरला काढले आहे. अनुभव नसणारे प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा होता. त्यात टॅब्लेट देण्यात येणार होते. त्याबाबतचे काहीच नियोजन नाही. उच्च शिक्षणाच्या प्रवेश पूर्वपरीक्षेच्या कोचिंगची योजना राबविताना तज्ज्ञांची समिती न नेमता कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून योजना तयार केल्यामुळे त्यात मूलभूत त्रुटी आहेत.

यूपीएससी ८० विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा

बार्टी, टार्टी, सारथी या संस्था अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा, कुणबी या जातींच्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढावा याकरिता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेमध्ये मार्गदर्शनाकरिता आर्थिक साहाय्य करते. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये व मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये विद्यावेतन देते. ओबीसीचे ८० विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झाले आहे. महाज्योतीने विद्यावेतन देण्यासाठी ५ ते २५ एप्रिलदरम्यान अर्ज मागितले होते. ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; पण विद्यावेतनाबाबत काहीच निर्णय झाला नाही.

- ‘सारथी’ची स्थापना २०१८ मध्ये झाली आणि महाज्योतीचीसुद्धा याच वर्षी नोंदणी झाली. मराठा कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथीने पीएच.डी.धारकांना सर्व लाभ दिले; पण महाज्योती पीएच.डी.धारकांचे प्रश्नच सोडवू शकली नाही.

किरण वर्णेकर, पीएच.डी.धारक

- विमुक्त भटक्यांचा केवळ नावापुरता समावेश

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मध्ये विमुक्त भटक्या जातिजमातीचा समावेश केला आहे. ही संस्था प्रशिक्षणापुरतीच नाही तर संशोधन करणारी संस्थाही आहे. भटक्यांची शैक्षणिक पातळी अत्यल्प आहे. त्यामुळे महाज्योतीमध्ये राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ केवळ ओबीसीचे विद्यार्थी घेऊ शकतात; पण भटक्या विमुक्त जातिजमातीच्या समस्या वेगळ्या आहेत. मच्छीमार, बेलदार, पारधी, कैकाडी, नाथजोगी, गोसावी, मशानजोगी या जमातींवर संशोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे. संशोधनातून सरकारपुढे त्यांच्या व्यथा मांडण्याची गरज आहे.

- गजानन चंदावार, संघटक, युवा संघर्ष वाहिनी