शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीतून उगवला यशाचा ‘मंगल’मय सूर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 09:52 IST

बारावीचा निकाल लागला आणि ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती.

ठळक मुद्देमोलमजुरी करणाऱ्या मंगलाची झेप वडील अर्धांगवायूने ग्रस्तआईचे संघर्षातून पोरीला शिकवण्याचे ध्येय

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीचा निकाल लागला आणि गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. तिनेही बारावीची परीक्षा दिली होती. ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती. शिक्षकांनी ती काम करीत असलेले शेत गाठले आणि दुरूनच आनंदाने ही आनंदवार्ता दिली. ती मात्र निश्चल. ‘ठीक आहे सर..., उद्या शाळेत येते’, असे बोलून ती पुन्हा कामाला लागली.ही गुणवंत मुलगी पारशिवनी तालुक्यातील सालई गावची मंगला भाऊराव झोड आहे. झोपडीत राहणाऱ्या मंगलाचा संघर्ष हेलावणारा आहेच. विदारक परिस्थितीतही तिने बारावीच्या परीक्षेत मिळविलेले ७७ टक्के गुण, गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांसारखेच प्रभावी आहे. मंगलाचे वडील अर्धांगवायुमुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यामुळे लहान भाऊ व मंगलाच्या शिक्षणाचा आणि संसाराचा भार एकट्या तिच्या आईवर आहे. कामावर गेली नाही तर जेवणार कसे, हा प्रश्नच जिथे रोज पडतो तिथे शाळेचा विचारही कसा करावा, हा प्रश्न मंगलापुढे होता. मात्र तिच्यात असलेली शैक्षणिक गुणवत्ता प्रभावित करणारी असल्याने, शिक्षकांना तिच्या गुणवत्तेवर विश्वास होता. म्हणूनच पैसे नसल्याने मंगला दहावीच्या परीक्षेला मुकणार ही माहिती मिळताच, शिक्षक मदतीसाठी पुढे आले. पुढे एका शिक्षकाने तिच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचनच दिले. मंगला मात्र स्वाभिमानी. शिक्षकांचा आपल्यावर विश्वास आहे, तर आपणही त्यासाठी झटावे हा तिचा इरादा. परिस्थिती असतानाही तिने शिक्षकांपुढे हात पसरले नाही. ती शाळेच्या सुटीच्या दिवशी आईबरोबर शेतात काम करू लागली.आई कामावर जात असल्याने शाळेच्या दिवशी वडिलांची काळजी, घरचे सर्व काम आटोपून १० किलोमीटरचा शाळेचा प्रवास सायकलने करायची. शाळेतून गेल्यावर पुन्हा घरची कामे आणि मिळालेल्या वेळेत अभ्यास.अशाही परिस्थितीत तिने ७७ टक्के गुण मिळवित बाभुळवाड्याच्या लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून पहिला येण्याचा मान पटकाविला. मंगलाला पुढे स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा आहे. परंतु परिस्थिती साथ देईल का, याची भीती तिला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८