शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  ऋत्विकच्या ‘हिट विकेट’ने सारेच संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 20:57 IST

सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.

ठळक मुद्देआत्मघात कशासाठी? : वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋत्विक बोके. एमएचके संचेती स्कूलचा बारावीचा विद्यार्थी. अभ्यासात हुशार आणि खेळातही. क्रिकेट टीमचा बेस्ट बॉलर. सोमवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दिवसभर ऋत्विक घरीच होता. त्याने मनातले काहीच जाणवूही दिले नाही. सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे.त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनसमोरील मल्लिका अपार्टमेंटमध्ये बोके कुटुंब राहते. दिलीप बोके हे शिक्षक आहेत. ऋत्विक हा वर्धा रोडवरील एमएचके संचेती स्कूलमध्ये बारावीला शिकत होता. बारावीचे वर्ष असल्याने ऋत्विकने खेळाकडे थोडे दुर्लक्ष करून, अभ्यासात लक्ष केंद्रीत केले होते. इंजिनीअर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू होते. त्याची दैनंदिनी अतिशय व्यस्त होती. क्लासेस, कॉलेज, अभ्यास, मित्र यातच त्याचा भरपूर वेळ जायचा. एक आठ दिवसांपूर्वी वडिलांनी त्याला अभ्यासाबद्दल विचारले, त्याने व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले. घरची मंडळी कधीच त्याला अभ्यासाबद्दल एक शब्दसुद्धा बोलली नाही. मुळात ऋत्विक असे काही बोलण्यास जागाच ठेवत नव्हता. अतिशय मनमिळावू, सर्वांशी बोलणारा, कुटुंबात-मित्रात, कॉलनीमध्ये सर्वांचा चाहता होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीतही आत्महत्येचे कुठलेही ठोस कारण पुढे आले नाही.मुलांशी संवाद वाढवाऋत्विक ज्या वयाचा होता त्या वयात अनेकदा चांगल्या-वाईटातील फरक कळत नाही. विवेकावर भावना भारी पडतात. अशा स्थितीत आपल्या माणसांचा भावनिक आधार फारच गरजेचा असतो. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैलीत पालकांचा मुलांशी फारसा संवादच होत नाही. परिणामी मुलांच्या मनात काय चाललय कळत नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मुलांशी संवाद वाढविणे नितांत गरजेचे आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी