शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीचा ओघ मात्र घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 07:00 IST

Nagpur News कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे.

ठळक मुद्देऑगस्टच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये दानदात्यांची संख्या ०.९० टक्क्यांवर

योगेश पांडे

नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत तर नोव्हेंबरमधील दानदात्यांची संख्या अवघी ०.९० टक्के इतकी आहे. याशिवाय मुख्यमंत्री मदतनिधी व मुख्यमंत्री कृषी मदतनिधीकडे देखील दात्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेता, मुख्यमंत्री कोविड मदतनिधीची स्थापना केली व जनतेने त्यात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या मदतनिधीत मोठ्या प्रमाणात मदत आली होती. २०२१ मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३९ हजार ८७९ नागरिकांनी या निधीत मदत केली व यातून १९४ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले. जानेवारी महिन्यात ३३१ जणांनी १ कोटी ५३ लाख रुपयांचे सहकार्य केले; तर ऑगस्टमध्ये दानदात्यांचा आकडा वाढून १९ हजार ७९ वर गेला व महिन्याभरात ८५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतर मदतीचा ओघ घटत गेला. नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात दानदात्यांची संख्या घटून ६९ वर पोहोचली; तर मदतीचा आकडा ८० लाख ५ हजार इतकाच होता. ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत असताना मदतनिधीची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.

कृषी मदतनिधीत केवळ ४४ जणांचे योगदान

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी मदतनिधीच्या माध्यमातूनही मदत करण्यात येते. कोरोनाच्या कालावधीत या निधीत वर्षभरात ४४ जणांनी केवळ ४ लाख ५८ हजार रुपयांचे योगदान दिले.

मुख्यमंत्री मदतनिधीला मिळाले ५१ कोटी

नैसर्गिक संकट, वैद्यकीय उपचार यासारख्या विविध बाबींसाठी मुख्यमंत्री मदतनिधीतून पीडित जनतेला मदत करण्यात येते. या निधीत वर्षभरात ४ हजार १९१ लोकांनी मदत केली व यातून ५१ कोटी १० लाखांचा निधी गोळा झाला.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस