शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिका २५५ कोटींची वसुली कशी करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:04 IST

नागपूर महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमालमत्ता विभागापुढे आव्हान फेब्रुवारी अखेरीस १३७ कोटींची कर वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर विभाग कर वसुलीच्या कामाला लागला आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांचाही समावेश आहे. मार्च अखेरीस २९२ .१९ कोटींची वसुली अपेक्षित असताना फे ब्रुवारी अखेरीस कर वसुलीतून १३७. ४८ कोटींचा महसूल जमा झाला. त्यामुळे महिनाभरात २५५ कोटींची वसुली कशी होईल, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी वर्ष २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात मालमत्ताकरापासून ३९२.१९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु गुरुवारपर्यत मालमत्ताकरापासून १३७.४८ कोटींची वसुली झाली. सध्याची परिस्थिती विचारात घेता ३१ मार्चपूर्वी २५५ कोटींची वसुली अवघड असल्याचे चित्र आहे. २ लाखांच्या आसपास डिमांड जारी करण्यात आलेल्या आहेत. मालमत्ता सर्वेक्षणाची प्रक्रिया ठप्पच आहे. ४२ टक्के मालमत्ताचे सर्वेक्षण शिल्लक आहे. सर्वेक्षण झाले नसल्याने ३१ मार्चपूर्वी सर्व डिमांडचे वाटप अशक्य आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी मालमत्ता विभागाला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या ४० टक्के कार्यालयांनी कर भरलेला नाही. याचाही वसुलीला फटका बसला आहे.

९१२५ आक्षेप नोंदविलेमालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्याचा नगरसेवकांनी आरोप केला होता. यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सोबतच आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात मालमत्ता कर विभागाकडे ९१२५ आक्षेप नोंदविण्यात आले. वास्तविक महापालिके च्या रेकॉर्डनुसार शहरात ५.३६ लाख मालमत्ता आहेत. सायबरटेक कंपनीने ३.८३ लाख मालमत्तांचा सर्वे केला आहे. यातील २.५९ लाख मालमत्तांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. ७२ हजार नवीन मालमत्ता आढळून आलेल्या आहेत. यातून आक्षेप नोंदविणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

एलबीटीपासूनही कमी उत्पन्नमागील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था करापासून (एलबीटी)९६ कोटींची वसुली झाली होती. या वर्षात फे ब्रुवारी अखेरीस ३८.५ कोटींची वसुली झाली आहे. एक महिन्यात ५८ कोटींची वसुली शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा स्थानिक स्वराज्य संस्था करापासूनची वसुली कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात मुद्रांक शुल्कापासून ५२.४४ कोटी मिळाले होते. तर यावर्षी फेब्रुवारी अखेरीस ४७. २७ कोटींची वसुली झाली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका