शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

- तर कसे होणार कुपोषण निर्मूलन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:34 IST

कुपोषण निर्मूलनासाठी महिला व बाल कल्याण विभागाने एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची स्थापना केली.

ठळक मुद्देबाल विकास प्रकल्पाला कार्यालयच नाही : काम करताना कर्मचाºयांची गोची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुपोषण निर्मूलनासाठी महिला व बाल कल्याण विभागाने एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची स्थापना केली. नागपूर जिल्ह्यात १३ तालुक्यात प्रकल्पाचे कार्यालय आहे. परंतु या कार्यालयाला स्वत:च्या इमारती नाही. पंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाच्या इमारतीत एखाद्या अडगळीच्या खोलीत या प्रकल्पाचा कारभार चालतो. पावसाळ्यात तर कर्मचाºयांना बसण्याची सोय नसते, अशी अवस्था प्रकल्प कार्यालयाची आहे. त्यामुळे कुपोषणाच्या योजना राबविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.बाल्यावस्था ही मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्याची तपासणी, अनौपचारिक शालेयपूर्व शिक्षण अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येते. अंगणवाडीच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे. यात पाच ते सहा पर्यवेक्षक, एक विस्तार अधिकारी, एक बालविकास प्रकल्प अधिकारी, एक वरिष्ठ व एक कनिष्ठ लिपिक, एक ड्रायव्हर व एक शिपाई असा कर्मचारीवर्ग प्रकल्प कार्यालयात कार्यरत आहे. या कार्यालयातून योजनेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते. बालकांची आकडेवारी गोळा केली जाते. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात हे कार्यालय आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बाल विकास प्रकल्प स्थापन केले, परंतु या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. जुन्या इमारतीतील एका खोलीमधून या कार्यालयाचा कारभार चालतो. पावसाळ्यात खोलीमध्ये बसणेही शक्य नसते. याचा फटका कामकाजावर बसतो आहे.इमारतीसाठी पाच कोटी हवेतजिल्ह्यात एकूण १३ एकात्मिक बाल विकास प्रकल्प आहेत. परंतु एकही कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. १३ तालुक्यात हे कार्यालय बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे.