शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

१०८ कोटींचा निधी आठ दिवसात कसा खर्च करणार? जि.प. प्रशासनापुढे पेच

By गणेश हुड | Updated: February 8, 2024 18:54 IST

जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो.

नागपूर: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत  विविध योजनांसाठी १०८ कोटींचा निधी गेल्या सोमवारी जिल्हा परिषदेच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. अगामी लोकसभा निवडणूक विचारात घेता प्राप्त निधी १५ फेब्रुवारीपर्यत खर्च करण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. परंतु आठवडाभरात हा निधी खर्च कसा होणार असा प्रश्न विभाग प्रमुखांना पडला आहे. जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो. सर्वसाधारण सभेत जनसुविधा व नागरी सुविधांच्या निधीवरुन सत्ताधारी व प्रशासनात चांगलाच वाद निर्माण झाला होता.

आर्थिक वर्ष संपण्याला पावनेदोन महिन्यांचा कालावधी असला तरी अगामी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता पुढील काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचार संहिता लागण्यापूर्वी मंजुरी व कार्यादेश न झाल्यास हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. तीन दिवसापूर्वी जनसुविधासाठी २० कोटी तर नागरीसुविधासाठी २४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. नागरी सुविधा व जनसुविधासोबतच शिक्षण  विभाग, पाधन रस्ते आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बाांधकामासाठी हा निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर