शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन टक्क्यांच्या रकमेत उदरनिर्वाह करायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:36 IST

ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. मात्र, अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरोजगारसेवकांना अत्यल्प मानधन किमान तीन हजार मजूर कामावर असणे आवश्यक

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांद : ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. रोजगारसेवक मानधनावर कार्यरत आहे. पूर्वी त्यांना दर महिन्याला ठराविक मानधन दिले जायचे. मात्र, शासनाने यात फेरबदल केला असून, मानधनाच्या रकमेचा संबंध कामावर असलेल्या मजुरांच्या संख्येशी जोडला. नवीन नियमानुसार त्यांना सव्वादोन टक्के मानधन मिळणार असून, त्यासाठी किमान तीन हजार मजूर कामावर असणे अनिवार्य आहे. या अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्टय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जात असून, ती कामे मजुरांकरवी केली जातात. त्या मजुरांवर देखरेख ठेवणे तसेच त्यांचे हजेरीपत्रक तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातून शहरांकडे येणारा बेरोजगारांचा लोंढा थांबविण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित करून त्याआधारे ग्रामीण भागातील एका कुटुंबाला वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

मानधनाचे स्वरूपया रोजगारसेवकांना त्यांच्या मजुरीच्या हजेरीपत्रकाप्रमाणे मानधन दिले जाते. महिनाभरात तीन हजार मजूर कामावर असल्यास त्यांना सव्वादोन टक्के, दोन हजार मजुरांवर चार टक्के आणि एक हजार मजुरांवर सहा टक्के मानधन दिले जाते. त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात पाठविले तर २२५ रुपये अतिरिक्त दिले जाते. त्यांना महिनाभरात चारदा पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असून, प्रवासभत्ता हा महिन्याकाठी आठ दौऱ्यांचा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे दौऱ्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही त्यांना सोसावा लागतो.

वर्षभरापासून मानधन नाहीभिवापूर तालुक्यातील बहुतांश रोजगारसेवक पदवीधर असून, त्यांना वर्षभरापासून त्यांच्या कामाचे मानधन व प्रवासभत्ता मिळाला नाही. काहींचे तीन महिन्यांपासून मानधन प्रशासनाकडे प्रलंबित आहे. अशा विपरीत परिस्थितीत केवळ गरज म्हणून रोजगारसेवक कामे करीत आहेत. पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागातील काही नियमित व कंत्राटी कर्मचारी स्वत:ला अधिकारी समजून रोजगारसेवकांना त्रास देत असतात. त्यांना वारंवार परत पाठवीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारामुळे त्यांचे हाताखालच्या मजुरांवर देखरेख ठेवणे अवघड जाते.

टॅग्स :agricultureशेती