शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

लोकसभेत कसा धावणार हत्ती ?

By admin | Updated: June 3, 2017 01:46 IST

लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंंतर बसपाची चिंता वाढली आहे.

बसपाला नव्या उमेदवाराचा शोध : अंतर्गत गटबाजीमुळे खीळ कमलेश वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंंतर बसपाची चिंता वाढली आहे. बसपाकडून मोठी निवडणूक लढलेला उमेदवार पुन्हा पक्षाकडे फिरकून पाहत नाही, असा इतिहास असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बसपाला पुन्हा एकदा नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. पक्षांतर्गत टोकाला गेलेले मतभेद, एकमेकांविरोधात उघडपणे सुरू असलेली मोर्चेबांधणी, उत्तर प्रदेशातील पराभवामुळे खचलेले मनोबल या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ताकदीने उभे राहण्याचे आव्हान बसपासमोर आहे. महापालिकेच्या निवडणुकीत बसपाच्या तिकीट वाटपात बराच घोळ झाला. पक्षासाठी अनेक वर्षांपासून झटणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही. बंडखोरी करणाऱ्या तसेच बंडाचा सूर आळवणाऱ्या उत्तम शेवडे व सागर डबरासे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले. निवडणुकीत अंतर्गत वाद एवढा टोकाला गेला की प्रदेशाध्यक्ष विलास गरुड हे एकही जाहीर सभा घेऊ शकले नाहीत. या निवडणुकीत बसपा गटातटात विखुरल्याचे पहायला मिळाले. मात्र, बसपाच्या कॅडरने ‘हत्ती’ सोडला नाही व महापालिकेत १० नगरसेवक निवडून आले. त्यामुळे स्थानिक नेत्यांची शान राखल्या गेली. निवडणूक आटोपली असली तरी बसपातील धूसफूस मात्र कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाकडून मोहन गायकवाड रिंगणात होते. त्यांना ९६,४३३ म्हणजे सुमारे ८.८९ टक्के मते मिळाली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने सहाही मतदारसंघात लक्षणीय मते घेतली. उत्तर नागपुरात बसपाचे उमेदवार किशोर गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राऊत तिसऱ्या क्रमांकावर घसरले. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मोहन गायकवाड व किशोर गजभिये यांनी बसपाशी संबंध तोडले. त्यामुळे आता बसपाला पुन्हा एकदा नव्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. राज्यातील बसपाला उत्तर प्रदेशातून रसद पुरविली जात होती. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बसपाचा दारुण पराभव झाला. बसपाला तेथेच आता संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे नागपूर, विदर्भ व महाराष्ट्रात किती लक्ष दिले जाईल, हादेखील प्रश्नच आहे. मनपा निवडणुकीत पावणे चार लाखांवर मते महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे १०३ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात होते. या सर्वांना एकूण ३ लाख ९१ हजार मते मिळाली आहेत. प्रत्येक उमेदवाराला सरासरी ३ हजार ७९६ मते मिळाली आहेत. बसपाचे १३ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. त्यांना प्रत्येकी ८ ते ११ हजार मते मिळाली आहेत. मतदानाची ही आकडेवारी पाहता कॅडर पक्षापासून फारसे दुरावलेले नसल्याचे स्पष्ट होते. नेत्यांनी एकसंघ होऊन रणनिती आखली तर ‘हत्ती’ जोरात धावू शकतो. विरोधानंतरही गरुड यांना पुन्हा संधी प्रदेश अध्यक्ष विलास गरुड यांच्याविरोधात मोठा असंतोष होता. राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसपाच्या दारुण पराभवासाठी गरुड हेच जबाबदार असल्याचे आरोप पक्षांतर्गत विरोधकांकडून जाहीररीत्या करण्यात आले. गरुड यांना आता पदमुक्त करावे, त्यांच्यावर पुन्हा प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपवू नये, गरुड हटाव- बसपा बचाव अशी उघड मोहीम राबविण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपर्यंत गरुड यांच्या विरोधातील पुरावे सादर करण्यात आले. मात्र, यानंतरही बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी गरुड यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपद सोपवून बळ दिले. आता या संधीचे गरुड कसे सोने करतील याकडे पक्ष पदाधिकारी व कॅडरचे लक्ष लागले आहे. भाईचारा समित्यांची होणार पुनर्स्थापना ३ मे रोजी लखनौ येथे पक्षाची बैठक झाली. तीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिशा निर्देश जारी करण्यात आले. आजवर खा. वीर सिंग हे एकमेव महाराष्ट्र प्रभारी होते. आता स्थानिक पातळीवरील नेत्यांना वाव मिळावा यासाठी वीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अ‍ॅड. संदीप ताजने व ना.तु. खंडारे या दोन नेत्यांना अतिरिक्त प्रभारी नेमण्यात आले आहे. पक्षाने ओबीसी समाजाला जोडण्याचे काम सुरू आहे. आता नव्याने सर्व समाजाच्या भाईचारा समिती स्थापन केल्या जाणार आहेत. यानंतर जिल्हा स्तर, विधानसभा स्तर, सेक्टर स्तर, पोलिंग बूथ स्तरापर्यंत संघटन बांधणी केली जाणार आहे. यानंतर प्रत्यक्ष मैदानात रणनिती आखली जाईल, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.