शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

तर तलावाचे संरक्षण कसे होणार?

By admin | Updated: September 14, 2016 03:05 IST

गणेश उत्सवात शहरातील एतिहासिक तलावाचे संरक्षण व्हावे म्हणून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिका

स्वयंसेवी संस्थांचा असहकार : मनपाचा उद्देश सार्थ ठरण्यावर प्रश्नचिन्हनागपूर : गणेश उत्सवात शहरातील एतिहासिक तलावाचे संरक्षण व्हावे म्हणून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिका आपल्या सर्व यंत्रणेसह उत्सवाच्या काळात सज्ज होते. लाखो रुपये त्यासाठी खर्चही करते. परंतु तरीही तलाव प्रदूषित होतात. कारण गणेशभक्तांची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, तोपर्यंत तलावांचे संरक्षण शक्य नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी शहरातील पर्यावरणवादी संस्थांनी मनपाच्या खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित आहे. परंतु यावर्षी मनपाचा प्रबोधनाचा हा खांदा कमकुवत ठरतो आहे. कधीकाळी तलावाच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने पुढे येणाऱ्या पर्यावरणवादी संस्थांनी, यावर्षी सामूहिक कार्यातून फारकत घेतली आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज असूनही मनपाचा तलाव संरक्षणाचा उद्देश सार्थ ठरण्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सवात सर्वाधिक तलाव प्रदूषित होत असल्यामुळे मनपा आपल्या यंत्रणेसह प्रदूषण रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. मनपा आरोग्य विभागाच्या नियंत्रणात तलाव बचाव अभियान राबविण्यात येत आहे. शहरात जवळपास दीड ते दोन लाख मूर्तीची स्थापना झाली आहे. मंडळाच्या मूर्तींना पर्याय नसल्याने, घरगुती गणपतीचे विसर्जन तरी टाळता यावे यासाठी मनपाने यावर्षी गणेशोत्सवात १२५ कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. शहरातील तलावाच्या स्थळी प्रत्येक चौकात, सार्वजनिक ठिकाणी, उद्यान एवढेच नव्हे तर, गणेशभक्तांच्या घरी जाऊन विसर्जनाची व्यवस्था केली आहे. दरवर्षी अशीच यंत्रणा सज्ज असते. परंतु तरीही श्रद्धेपोटी गणेशभक्त तलावातच मूर्ती विसर्जित करतात. सामाजिक संस्थांमुळे घरगुती गणपतींचे तलावात होणारे विसर्जन टाळता येऊ शकते. निर्माल्यामुळे होणारे प्रदूषणही रोखता येऊ शकते. कारण प्रबोधनाचे मोठे काम या संस्थांकडून करण्यात येते. परंतु यावर्षी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मंदावल्याचे दिसते आहे. आतापर्यंत मनपाकडे या कार्यात केवळ सात स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आश्वस्त केले आहे. तेही विसर्जनाच्या अंतिम दिवशी. शहरातील सहा तलावात विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जेवढ्या जास्त स्वयंसेवी संस्था सहभागी होतील, तेवढे तलावाचे प्रदूषण टाळता येईल. यावर्षी ते शक्य होताना दिसत नाही. मुळात स्वयंसेवी संस्थांना या कार्यात रस राहिलेला नाही, मनपाकडून त्यांचा अपेक्षित सन्मान होत नाही, त्यामुळे प्रतिसाद अल्प दिसतो आहे. परिणामी मनपाची यंत्रणा असतानाही तलावाचे संरक्षण ही सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)