शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार रुपयांत कशा होणार स्पर्धा?; आयोजक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:25 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षीचा स्पर्धेचा निधीच मिळाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे. सलग दोन दिवसांपासून लोकमतने हा विषय उचलून धरला आहे. यासंदर्भात स्पर्धेचे इंचार्ज योगेश खोब्रागडे यांना विचारणा केली असता, आम्ही काय करणार? १५ हजार रुपयांत होतात का स्पर्धा? गेल्यावर्षीचा क्रीडा स्पर्धेचा निधी अजूनही मिळालेला नाही? यासाठी आयोजक जबाबदार नसून शासन जबाबदार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मानकापूर क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय, शहरस्तरीय व विभागीय अशा सहा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या दिवशी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. आॅक्टोबर हिटचा चटका सहन करीत विद्यार्थी उन्हात दम टाकत बसल्याचे चित्र होते. त्यांच्यासाठी सावलीची सोय करण्यात आली नव्हती. चेंजिंग रुम, शौचालयाची सोय, प्राथमिक उपचार या सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या.यासंदर्भात आयोजन प्रमुखांनी सांगितले की, जवळपास ४५० च्या जवळपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी येतात. १५ हजार रुपये या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यातही स्टेशनरीचे २५०० रुपये कापून घेतल्या जातात. दररोजचा पाण्याचा खर्च हा चार हजार रुपयांवर येतो. रेफरी आणि कोचचे आठ ते दहा हजार रुपये पेड करावे लागतात. पेंडॉल खुर्च्या याचा खर्च किमान १० हजार रुपये येतो. मिळणाऱ्या निधीपेक्षा खर्चच जास्त असल्याने कुठून करणार विद्यार्थ्यांच्या सोयी असा सवाल त्यांनी केला. निधीअभावी आम्ही कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध करू शकत नाही. साधी वीजसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. २०० रुपयांच्या बॅटरीवर साऊंडचे काम सुरू आहे. आयोजक काहीच करू शकत नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व विभागीय क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेचा निधी अजूनही मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. - शाळांकडून जमा होणारा पैसा जातो कुठे?शाळांकडून क्रीडा शुल्काच्या नावाने जिल्हा क्रीडा परिषद पैसा गोळा करते. या परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. हा निधी वर्षाला किमान १४ ते १५ लाख जमा होत असल्याचे सांगण्यात येते. यातून तुटपुंजी रक्कम स्पर्धेच्या आयोजनासाठी मिळते. तेही अ‍ॅडव्हान्स मिळत नाही. जिल्हा क्रीडा परिषदेकडे जमा होणारा क्रीडा स्पर्धेचा निधी इतर हेडवर खर्च केल्या जात असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Governmentसरकार