शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आणखी किती वेटिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:52 IST

दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाºया रेल्वेगाड्यांचे वेटिंग वाढले आहे. अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ म्हणजे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. दिवाळी संपेपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रतीक्षा यादी वाढली असली तरी अनेक प्रवासी अधिक पैसे मोजून तात्काळच्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करताना दिसत आहेत.दिवाळीत भाऊबीजेला येणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी असते. त्यामुळे या कालावधीत रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल होतात. दिवाळी आटोपल्यानंतर प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू होतो.त्यामुळे दिवाळीनंतरही रेल्वेगाड्यात मोठी प्रतीक्षा यादी पाहावयास मिळते. यात नागपुरातून मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. दिवाळीनंतर २७ आॅक्टोबरपर्यंच्या स्थितीचा आढावा घेतला असता नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये ८० ते १५७ वेटिंग, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १२६, २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २७ आॅक्टोबरला १५० वेटिंग आहे तर १२२९० दुरांतो एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत १८२ वेटिंग आहे. नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १२३ वेटिंग, २४ आॅक्टोबरला २८९ वेटिंग आहे.दिल्लीकडे जाणाºया गाड्यात १२६५१ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला ४५ वेटिंग आणि २४ आॅक्टोबरला ४४ वेटिंग आहे. १२६१५ नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेसमध्ये २४ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. १२७२१ नागपूर-निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये २३ आॅक्टोबरला रिग्रेट, २४ आॅक्टोबरला ९५ वेटिंगची स्थिती आहे. हावडा मार्गावर १२८५९ नागपूर-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९७ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ८१ वेटिंग, २४ आॅक्टोबरला ८३ वेटिंग आहे.१२१२९ आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ९८ वेटिंग, २३ आॅक्टोबरला ४२ वेटिंग आणि २५ आॅक्टोबरला ७१ वेटिंग आहे. १८०२९ शालिमार एक्स्पे्रसमध्ये २३ आॅक्टोबरला १०० वेटिंग, २४ आॅक्टोबरला ५२ वेटिंग आणि २६ आॅक्टोबरला ८२ वेटिंग आहे. चेन्नईकडे जाणाºया गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८९ वेटींग आहे. तर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये २२ आॅक्टोबरला ८१ आणि २३ आॅक्टोबरला ३८ वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाड्यातील वेटिंगमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, त्यांना विना बर्थचा प्रवास करावा लागणार आहे. प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी अनेक प्रवासी तात्काळच्या रांगेत उभे राहून बर्थ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.