शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यात किमान जमा नसल्यास किती दंड आकारावा ? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 21:02 IST

बँकांतील बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा नसल्यास जास्तीतजास्त किती दंड आकारायला पाहिजे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली व यावर तीन महिन्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्दे रिझर्व्ह बँकेला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकांतील बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा नसल्यास जास्तीतजास्त किती दंड आकारायला पाहिजे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली व यावर तीन महिन्यामध्ये भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंजनकुमार चॅटर्जी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्यांच्याकडील बचत खात्यामध्ये महानगरांतील ग्राहकांना ३०००, शहरातील ग्राहकांना २००० तर, ग्रामीण भागातील ग्राहकांना १००० रुपये किमान जमा ठेवणे आवश्यक आहे. ही किमान रक्कम जमा न ठेवल्यास ५० रुपये महिन्याप्रमाणे दंड आकारला जातो. इतर बँकांच्या तुलनेत हा दंड खूपच जास्त आहे. अशा दंडातून ही बँक दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. ही वसुली अवैध आहे. त्यामुळे बँकेवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे चॅटर्जी यांचे म्हणणे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने यावर स्वत:ची बाजू स्पष्ट करताना याचिकेतील मुद्यांमध्ये काहीच नवीन नसून या विषयावर आधीच बँकेच्या बाजूने न्यायनिवाडे झाले असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. याचिकाकर्त्याने स्वत: तर, स्टेट बँकेतर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँक