शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोसेखुर्द’चे नेमके काम झाले तरी किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:24 IST

गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके प्रत्यक्ष काम किती झाले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमंत्रालय आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत : गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचा आकडा सात टक्क्यांनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे नेमके प्रत्यक्ष काम किती झाले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.गोसेखुर्द प्रकल्प मंडळाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार गोसेखुर्द प्रकल्पाचे आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ४० टक्के काम अपूर्ण आहे. मात्र केंद्रीय जलसंपदा, नदी विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मात्र वेगळीच माहिती आहे. संकेतस्थळावर प्रत्येक सिंचन प्रकल्पाची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. गोसेखुर्दचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत झाला असून त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. संकेतस्थळानुसार गोसेखुर्दचे प्रत्यक्ष काम हे ६७.०१ टक्के इतके झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्प मंडळ व मंत्रालयाच्या आकडेवारीत थोडीथोडकी नव्हे तर सात टक्क्यांची तफावत आहे. त्यामुळे नेमका आकडा काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, सुरुवातीला प्रकल्पाच्या उभारणीची अंदाजित किंमत ३७२ कोटी इतकी होती. आता ती १८ हजार कोटींहून अधिक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या कामासाठी ११ हजार ८५ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला.काम कधी सुरू झाले?गोसेखुर्द प्रकल्प मंडळातर्फे आकडेवारीत आणखी एक घोळ करण्यात आला आहे. ७ जानेवारी २०१६ रोजी मंडळाने माहितीच्या अधिकारात प्रकल्पाचे काम हे १ फेब्रुवारी १९८१ रोजी सुरू झाल्याचे नमूद केले होते. तर १ जानेवारी २०१९ रोजीच्या माहिती अधिकाराच्या उत्तरात गोसेखुर्दचे काम ३१ मार्च १९८३ रोजी सुरू झाल्याचा उल्लेख आहे. एकाच मंडळाच्या एकाच मुद्यावरील माहितीत तारीख वेगवेगळी कशी असू शकते हे एक कोडेच आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पnagpurनागपूर