शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उके यांच्याविरुद्ध किती फौजदारी प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:34 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अ‍ॅड. सतीश उके यांना त्यांच्या स्वत:विरुद्ध किती फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत याची माहिती एक आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, उके यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सरकारने त्यातील माहितीची पुढील दोन आठवड्यात पडताळणी पूर्ण करावी व आवश्यकता भासल्यास प्रति-प्रतिज्ञापत्र सादर करावे असे सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : एक आठवड्यात मागितले प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अ‍ॅड. सतीश उके यांना त्यांच्या स्वत:विरुद्ध किती फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत याची माहिती एक आठवड्यात प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, उके यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर सरकारने त्यातील माहितीची पुढील दोन आठवड्यात पडताळणी पूर्ण करावी व आवश्यकता भासल्यास प्रति-प्रतिज्ञापत्र सादर करावे असे सांगितले.न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात उके यांनी उच्च न्यायालयात माफीनामा दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड.ए. हक व विनय देशपांडे यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, अतिरिक्त सरकारी वकील केतकी जोशी यांनी उके यांच्याविरुद्ध काही फौजदारी प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे न्यायालयाने उके यांना त्यांच्याविरुद्धची फौजदारी प्रकरणे रेकॉर्डवर आणण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता १९ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.उके हे न्यायमूर्ती, न्यायिक अधिकारी, सरकारी वकील आदींवर सतत गंभीर आरोप करीत होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्वत:च अवमानना याचिका दाखल केली होती. अंतिम सुनावणीनंतर ८ फेब्रुवारी २०१७ रोजी उके यांना न्यायालय अवमाननेच्या गुन्ह्यात दोषी ठरवून दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाविरुद्ध उके यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपील खारीज झाल्यानंतर त्यांनी पुनरावलोकन याचिका दाखल केली. त्यात उके यांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त क्षमा मागण्याची व सर्व आरोप मागे घेण्याची तयारी दर्शवली. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी अनुमती दिल्यामुळे उके यांनी उच्च न्यायालयात माफीनामा दाखल केला आहे.काही आदेशांचे पालन नाहीया प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या काही आदेशांचे उके यांनी पालन केलेले नाही. न्यायालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले असता उके यांनी संबंधित आदेशांचे पालन करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागून घेतला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे