शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठांना किती अनुदान मंजूर केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:17 IST

राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना आतापर्यंत किती अनुदान मंजूर केले व त्यापैकी किती अनुदानाचे वाटप झाले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला मागितले उत्तर

नागपूर : राज्यातील तीन महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठांना आतापर्यंत किती अनुदान मंजूर केले व त्यापैकी किती अनुदानाचे वाटप झाले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाशी संबंधित प्रश्नांसंदर्भात उच्च न्यायालयात दोन वर्षांपासून जनहित याचिका प्रलंबित आहे. हायकोर्ट बार असोसिएशनने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या याचिकेत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे हे विद्यापीठ २०१६-२०१७ सत्रापासून कार्यान्वित झाले. विद्यापीठ कॅम्पसकरिता वारंगा येथील ७५ एकर जमीन देण्यात आली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह मिळाले. कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सध्या हे विद्यापीठ सिव्हिल लाईन्स येथील ज्युडिशियल आॅफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (जोती) येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरू आहे. असोसिएशनतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.दीड कोटी देण्याचा आदेशवाढत्या खर्चामुळे निधीची चणचण भासत असल्याने नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला तीन कोटी रुपये अनुदान मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सरकारने विद्यापीठाला दीड कोटी रुपये दिले. उर्वरित दीड कोटी रुपये सरकारला एक आठवड्यात द्यायचे आहेत. न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला. पहिल्या वर्षी विद्यापीठातील एल.एल.बी. अभ्यासक्रमात ६० तर, एल.एल.एम. अभ्यासक्रमात १० विद्यार्थी होते. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ