शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 22:28 IST

गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धर्मदास बागडे यांनी कोरोनाशी संबंधित विविध मागण्यांसह जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाईनमधील रुग्णांना रोज ५०० रुपये देण्यात यावे, नागपूरमध्ये प्रत्येकी ५०० खाटा व आधुनिक आरोग्य सुविधांसह दोन रुग्णालये बांधण्यात यावी, जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर आवश्यक रुग्णालये बांधण्यात यावीत, हे काम तीन वर्षात पूर्ण करण्यात यावे आणि तोपर्यंत नागरिकांकडून कर वसूल करण्यात येऊ नये, अशा याचिकाकर्त्यांच्या मागण्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सी. पी. चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.खाटा अनुपलब्धतेवर जनहित याचिकाउच्च न्यायालयाने कोरोनाबाधित व्यक्तींना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध केल्या जात नसल्याच्या बातमीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. सदर याचिकेवर २ सप्टेंबर रोजी दत्ता व बागडे यांच्या याचिकेसोबत सुनावणी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय