शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मेयो इस्पितळ येथील अतिक्रमण कधीपर्यंत हटवता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:39 IST

मध्य भारतामधील गरजू रुग्णांचा आधार असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिक्रमण कधीपर्यंत हटवता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाने मागितले उत्तर : शासनाला दोन आठवड्याचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारतामधील गरजू रुग्णांचा आधार असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील अतिक्रमण कधीपर्यंत हटवता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी १३ जानेवारी २०१७ रोजीच्या आदेशाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. त्या आदेशात न्यायालयाने मेयोमधील अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. परंतु, अद्यापही त्या आदेशावर अंमलबजावणी करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने शासनाला यावर जाब विचारला.५ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १८ अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३ कोटी २५ लाख ९७ हजार ४८३ रुपये मंजूर केले आहेत. परंतु, अद्याप उपकरणांची खरेदी करण्यात आली नाही. ही खरेदी लवकर न झाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे. तसेच, मेयोमधील नवीन शस्त्रक्रिया विभागाचे विद्युतीकरण व एसी लावण्याचे काम अपूर्ण आहे. न्यायालयाने शासनाला यावरही स्पष्टीकरण मागितले आहे. विदर्भातील शासकीय रुग्णालयांच्या विकासाविषयी २००० सालापासून न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील अनेक प्रश्न न्यायालयासमक्ष मांडण्यात आलेत. न्यायालयाच्या आदेशांमुळे त्यापैकी बरेच प्रश्न सुटले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHigh Courtउच्च न्यायालय