शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन कसे वाढणार?

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

जिल्ह्यातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव व पाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन अशा कामांसाठी २०१४-१५ या वर्षात ८.४७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१३-१४ या वर्षातील

जेमतेम २.५४ कोटी खर्च : तलाव-बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची गरजनागपूर : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव व पाटबंधाऱ्यासाठी भूसंपादन अशा कामांसाठी २०१४-१५ या वर्षात ८.४७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१३-१४ या वर्षातील ४. ३८ कोटींचा अखर्चित निधी असा १३ कोटींचा निधी असतानाही डिसेंबर २०१४ पर्यंत जेमतेम २.५४ कोटींचा खर्च करण्यात आला. अशापरिस्थिीत जिल्ह्यातील सिंचन कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.्रबिगर अदिवासी क्षेत्रातील लघु सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती व त्यातील गाळ काढण्याची गरज आहे. जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील लघु पाटबंधाऱ्याच्या कामासाठी २५० लाखांची, कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ३५० लाखांची तर मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी १९ लाखांची तरतूद करण्यात आली होती. यातील जेमतेम २१ लाखांचा खर्च करण्यात आला. आदिवासी क्षेत्रातील लघु पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे व मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी ४५. ८२ लाखांची तरतूद करण्यात आली होती. ९.२७ लाखांचा खर्च करण्यात आला. अशीच परिस्थिती माडा ओटीएसी योजनेंतर्गत १७५ लाखांची तरतूद करण्यात आली होती.यातील जेमतेम ४० लाखांचा खर्च करण्यात आला. गेल्या वर्षीच्या अखर्चित ४४८ लाखांपैकी जेमतेम ४० लाखांचा खर्च करण्यात आला आहे.जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. याला आळा घालण्यासाठी सिंचन प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने शासनस्तरावर ठोस प्रयत्न होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)२०४७ प्रकल्प पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, मामा तलाव यांची संख्या २०४७ आहे. या प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीचा विचार करता वर्षाला १५ ते २० कोटी रु.ची असते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने मागील काही वर्षांत दुरुस्ती वा गाळ काढण्याची कामे झालेली नाही. जि.प.च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा होते; परंतु तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. डोहाची कामे रखडलीसिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या हेतूने सिंचनाची कामे केली जातात. गेल्या वर्षात १३६ डोहाची कामे अपेक्षित होती. परंतु यातील ४३ कामे अद्याप प्रलंबित आहेत. काही कामाचा दर्जा निकृ ष्ट असल्याच्या सदस्यांच्या तक्रारी आहेत. या प्रकरणांची चौकशी होण्याची गरज आहे.